AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुट्टीची मजा घ्यायला गेले, तब्बल 5 कोटींची लॉटरी जिंकून आले, एका सुट्टीने जोडप्याचं आयुष्य बदललं!

ऑस्ट्रेलियन जोडप्याला चक्क समुद्रकिनारी सुट्टी साजरी करतानाच अशी चांगली बातमी मिळाली. त्यांना तब्बल 5 कोटींची लॉटरी लागल्याचं समजलं.

सुट्टीची मजा घ्यायला गेले, तब्बल 5 कोटींची लॉटरी जिंकून आले, एका सुट्टीने जोडप्याचं आयुष्य बदललं!
सुट्टीवर असताना जोडप्याला तब्बल 5 कोटींची लॉटरी लागली
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 10:37 AM
Share

उपरवाला देता है तो छप्पर फाड के देता है! अशी हिंदीत म्हण आहे. पण हीच म्हण एका ऑस्ट्रेलियन जोडप्याबाबत खरी ठरली आहे. या ऑस्ट्रेलियन जोडप्याला चक्क समुद्रकिनारी सुट्टी साजरी करतानाच अशी चांगली बातमी मिळाली. त्यांना तब्बल 5 कोटींची लॉटरी लागल्याचं समजलं. त्यामुळं त्यांची ही सुट्टी इतकी खास झाली, की ही सुट्टी ते त्यांच्या आयुष्यात कधीही विसरु शकणार नाहीत. ( The Australian couple who went on holiday celebrated a lottery of Rs 5 crore )

जॅकपॉट लॉटरी जिंकलेल्या जोडप्याने सांगितले की, ते काही दिवसांपूर्वीची सुट्टी कधीही विसरु शकत नाही. या सुट्टीवर असताना त्यांनी लॉटरीचे तिकीट विकतं घेतलं, ज्याला $ 700,000 पेक्षा जास्तचे जॅकपॉट बक्षीस मिळालं. मात्र, या जोडप्याने त्यांची ओळख उघड केली नाही. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, ते केर्न्समध्ये सुट्टीवर होते, त्या दरम्यान त्याने बीच स्टोअरमध्ये गोल्ड लोट्टोसाठीच लॉटरीचं तिकीट खरेदी केलं.

त्यांच्या तिकीटावर 33-15-22-24-18-14 हा क्रमांक होता. जो ड्रॉच्या आकड्यांशी पूर्णपणे जुळला. यामुळे त्याचं नशीब एका रात्रीत बदललं. महिलेच्या पतीने अधिकाऱ्यांना सांगितलं की, “आम्ही काल रात्री द लॉट अॅपवर तिकीट तपासलं.” आम्हाला विश्वास बसत नव्हता, “तो म्हणाला. आम्हाला वाटले की ही एक प्रकारची चूक असावी. आमच्या बाबतीत असे कधीच घडले नाही, म्हणून हे सगळं स्वप्नासारखे वाटले.

या जोडप्याने सांगितले की, ते लॉटरी जिंकले असले तरी हवेत जाणार नाही आणि जबाबदारीने वागण्याचा प्रयत्न करतील. त्याचवेळी, लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीची पत्नी म्हणाली, “आम्हाला माहित नाही की आम्ही एवढ्या पैशांचे काय करू, म्हणून आम्हाला प्रथम एका आर्थिक सल्लागाराकडे जायचं आहे. आम्ही हे सुनिश्चित करू इच्छितो की, आम्ही या पैशाचा सुज्ञपणे वापर करू. ” आता ही कहाणी ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं!

हेही वाचा:

Video: बॉस बॉसच निघाला, चोरुन व्हिडीओ गेम खेळणाऱ्या कर्मचाऱ्याचा आयडियाने केला गेम!

Video: दाजीसोबत मेव्हणीचं लफडं, बायकोने बहिणीला थेट जॉब इंटरव्यूव्हदरम्यानच धुतलं

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.