VIDEO: कुत्रा आणि कबुतराची जोडी जमली, दोघांची मैत्री पाहून सर्वच चकीत

इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कुत्रा आणि कबुतर निवांतपणे बेडवर डुलकी घेत आहेत. सहसा कुत्रा आणि कोणताही पक्षी हे भांडताना दिसत असतात, पण या व्हिडीओमध्ये असं दिसून येत नाही.

VIDEO: कुत्रा आणि कबुतराची जोडी जमली, दोघांची मैत्री पाहून सर्वच चकीत

मुंबई : माणसाप्रमाणेत प्राण्यांमध्येही भावना असतात. प्राण्यांना माणसांसारखी भाषा समजत नसेल करी त्यांना प्रेमाची भाषा नक्कीच समजते. अनेकदा अशा अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यामध्ये प्राण्यांचे वागणे पाहून त्यांच्या प्रेमात पडायला होते. अनेकदा प्राण्यांचं आपआपसांतील प्रेम पाहूनही त्यांच्याबद्दल मनात प्रेमाची भावना निर्माण होते. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कबूतर एका कुत्र्यासोबत बेडवर  मस्तपैकी झोपा काढत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून या दोघांमधील मैत्री पाहून सर्वचजण चकीत झाले आहेत.

कबूतर आणि कुत्र्याच्या या व्हिडीओमध्ये दोघेही अतिशय क्यूट दिसत आहेत. त्यामुळे पाहणाऱ्यांनाही हा व्हिडीओ फार आवडत असून मोठ्या प्रमाणात नेटकरी हा व्हिडीओ शेअर करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या ट्विटरवर आयएफएस अधिकारी सुसांत नंदा यांनीही हा व्हिडीओ शेअर केला असून  त्याला एक गो़ड असं कॅप्शनही दिलं आहे. व्हिडीओमध्ये एका बाजूला एक कुत्रा आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला कबूतर झोपलं आहे. यामध्ये एक सर्वात भारी गोष्ट म्हणजे कबुतराने कुत्र्याचा पाय पकडून अगदी ला़डीवाळपणे डुलकी घेतली आहे.  यावरुनच नंदा यांनी ‘खरं प्रेम म्हणजे एकमेकांचे हात पकडणं’. असं कॅप्शन  दिलं आहे.

पाहा व्हिडीओ-

व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

या व्हिडीओला नेटकरी फार लाईक करत असूव हजारो लाईक्स या व्हिडीओला मिळत आहेत. अनेक जण व्हिडीओ शेअर करत त्यावर कमेंटही करत आहेत. यात एका युजरने, ‘किती भारी मैत्री आहे.’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने, ‘माणसांप्रमाणे प्राणीही सर्व गोष्टी समजतात आणि सर्वांवर प्रेम करतात’ अशी कमेंटही केली आहे.

हे ही वाचा-

VIDEO | गजबजलेल्या चौकात मॉडेलचा डान्स, नेटिझन्सनी फटकारलं, गुन्हा दाखल

कुत्रे किती हुशार असतात, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘काय भन्नाट व्हिडीओ आहे!’

(pigeon was seen lying comfortably with the dog watch the awsome video)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI