AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुत्रे किती हुशार असतात, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘काय भन्नाट व्हिडीओ आहे!’

कुत्री ( dog) नेहमी घरातील सदस्यांच्या अगदी जवळ असतात. त्यांना जे काही शिकवले जाते, ते ते उत्तम प्रकारे शिकतात. व्हायरल हॉगने ( viralhog ) इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडिओ असाच काहीसा आहे.

कुत्रे किती हुशार असतात, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, 'काय भन्नाट व्हिडीओ आहे!'
व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणात कुत्री किती हुशार असतात!
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 12:23 PM
Share

कुत्रे हे माणसाचे सर्वात चांगले मित्र असतात, यात शंका नाही. ते खूप हुशार आणि मायाळू असतात. इंटरनेटवर वेळोवेळी व्हायरल होणाऱ्या क्लिप याच गोष्टीला सिद्ध करतात की, कुत्री ( dog) नेहमी घरातील सदस्यांच्या अगदी जवळ असतात. त्यांना जे काही शिकवले जाते, ते ते उत्तम प्रकारे शिकतात. व्हायरल हॉगने ( viralhog ) इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडिओ असाच काहीसा आहे. व्हिडिओमध्ये हस्की जातीचा कुत्रा ( husky breed dog ) दिसतोय आणि मालकाच्या सूचनांचे तो पालन करतो आहे. मात्र त्याला त्याच्या मर्यादा चांगल्या प्रकारे माहित आहेत. ( husky breed dog knows its limits watching the video you will also say dogs are so clever )

इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडिओ एका घराचा आहे. क्लिपमध्ये, एका कुत्र्यासमोर बरेच रोल्स असतात, ज्यावर कुत्रा उडी मारतो. व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की, कुत्र्याचा मालक त्याला उडी मारण्यास सांगतो आणि तो खूप छान उडीही मारतो. मग कुत्र्याची मालकीन या रोलच्या वर अजून काही रोल वाढवते, ज्यावरुनही कुत्रा सहजरितीने उडी मारतो. अशा प्रकारे, मालकीन एकावर एक रोल वाढवत राहते आणि तो कुत्रा तिच्या सूचनांचे पालन करत उड्याही मारतो.

काही वेळानंतर, कुत्र्यासमोरच्या रोलची उंची खूप जास्त होते, मग तो उडी मारण्यात अयशस्वी होतो आणि तो भीतीपोटी पुढची उडी मारत नाहीत. त्याला त्याच्या मर्यादा कळतात. कुत्र्याची मालकीन त्याच्यावर उडी मारण्यासाठी खूप दबाव आणते, मात्र तो आपल्या बारीक आवाजात मालकीनीला नाही म्हणताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

काही दिवसांपूर्वीचा, मिस्टर कियाचा हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि यासोबत प्रेक्षकांच्या खूप कमेंट्स देखील आल्या. एका इंस्टाग्राम युजरने लिहिले, ‘गरीब कुत्रा’ दुसऱ्याने लिहिलं, ‘हा व्हिडिओ खूपच गोंडस आहे’ याशिवाय, उर्वरित युजर्सने हृदयाचे इमोजिज शेअर करून प्रेमाचा वर्षाव केला. तुमच्या माहितीसाठी प्राण्यांनाही माणसांप्रमाणे भावना असतात, ते आनंदी होतात, दु:खी होतात, प्रेमही करतात, त्यामुळे आताचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ याच गोष्टीची साक्ष देतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.