T20 World Cup: मॅच हारली आणि लोकांनी Dominos लाच धारेवर धरलं! ऑफर देणं पडलं महागात, Memes चा पाऊस

तर झालं असं कालच्या मॅचच्या वेळी डॉमिनोजने दिली एक भन्नाट ऑफर. म्हणे भारत जेव्हा जेव्हा इंग्लंडचा खेळाडू आऊट करेल तेव्हा तेव्हा पंधरा मिनिटाच्या आत फ्री गार्लिक ब्रेड दिले जातील.

T20 World Cup: मॅच हारली आणि लोकांनी Dominos लाच धारेवर धरलं! ऑफर देणं पडलं महागात, Memes चा पाऊस
dominos offer
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 11, 2022 | 3:57 PM

टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव केला आणि यासोबतच टीम इंडियाचा विश्वचषकाचा प्रवास संपला. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सलामी जोडी पूर्णपणे अपयशी ठरली. विराट आणि हार्दिकच्या अर्धशतकांमुळे टीम इंडिया कशी बशी 168 धावा करू शकली. इंग्लंडचा सलामीवीर ॲलेक्स हेल्स आणि कर्णधार जोस बटलर यांनी शतकी भागीदारी केली ज्यामुळे भारताला १० गडी राखून पराभव पत्करावा लागला.

#INDvsENG ट्विटरवर टॉप ट्रेंड करत आहे. आता मॅच म्हणल्यावर आपल्याला तर माहितेय काय माहोल असतो भारतात. मॅचच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी ऑफर्स सुरु असतात. झोमॅटो तर अनेकदा अशा ऑफर देतं.

तर झालं असं कालच्या मॅचच्या वेळी डॉमिनोजने दिली एक भन्नाट ऑफर. म्हणे भारत जेव्हा जेव्हा इंग्लंडचा खेळाडू आऊट करेल तेव्हा तेव्हा पंधरा मिनिटाच्या आत फ्री गार्लिक ब्रेड दिले जातील. आत्ताच ऑर्डर करा!

dominos offer

आता त्या डॉमिनोजच्या गार्लिक ब्रेडचे किती चाहते, हे सगळे चाहते टक लावून बसले की कधी विकेट पडणार आणि कधी आम्ही गार्लिक ब्रेड ऑर्डर करणार. पण असं झालंच नाही. ना विकेट पडली, ना गार्लिक ब्रेड घरी आला.

नंतर लोकांनी डॉमिनोजला जे काय ट्रोल केलं, बापरे! इतके सगळे मिम्स यावर शेअर करण्यात आले. डॉमिनोजलाही वाटलं असेल कुठून ही ऑफर दिली!