Shahajibapu Patil : ‘बघून झाली हिरवळ, वाट बघतोय झिरवळ!’ नेटकऱ्यांच्या प्रतिभेला बहर, राजकीय भूकंपातही विनोदाचा कहर

| Updated on: Jun 26, 2022 | 11:08 AM

त्यांना तुम्ही एक मिम द्या, त्याला प्रत्युत्तर ते हजार मिम देणार. मिम वाल्यांनी नरहरी झिरवाळांना यात ओढलं! विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ!

Shahajibapu Patil : बघून झाली हिरवळ, वाट बघतोय झिरवळ! नेटकऱ्यांच्या प्रतिभेला बहर, राजकीय भूकंपातही विनोदाचा कहर
'बघून झाली हिरवळ, वाट बघतोय झिरवळ!'
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतं! एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आपल्यासोबत काही आमदार घेऊन गुवाहाटीला निघून गेले आणि शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेत फूट पडली म्हणजे राज्याचं राजकारणच ढासळलं. राजकारणात गदारोळ! भूकंपावर भूकंप! आता इतक्या सिरीयस वेळी राजकारण (Politics) राहतंय बाजूला पण भलतंच काहीतरी व्हायरल होतंय. कुणी उठतंय संजय राऊतांवर मिम बनवतंय, कुणी देवेंद्र फडणवीसांनाच काय मिम मध्ये नाचवतंय. सगळे या राजकीय घटनांचा पुरेपूर आनंद घेतायत. आता यातच भर काय पडली तर काल आमदार शहाजीबापू पाटलांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral Audio Clip)  झाली. सगळ्या सोशल मीडियावर, “काय ती झाडी, काय डोंगार…” चालू झालं. पण शेवटी मिम बनवणारे सगळ्यात वरचढ! त्यांना तुम्ही एक मिम द्या, त्याला प्रत्युत्तर ते हजार मिम देणार. मिम वाल्यांनी नरहरी झिरवाळांना यात ओढलं! विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ! असा एक मस्त फोटो आहे झिरवाळांचा लांब कुठंतरी बघताना आणि तो फोटो वापरून नेटकरी त्यावर लिहितात, ‘बघून झाली हिरवळ, वाट बघतोय झिरवळ!’ बघुयात कालपासून नेमकी इंटरनेटवर काय काय चाललंय. किती लोकांचे झाडी, डोंगर पाहून झालेत…

1) संजय राऊतांनी तोच नरहरी झिरवाळांचा फोटो टाकला

विधानसभा उपाध्यक्षांकडून 16 बंडखोरांना निलंबनाची नोटीस आलीये. याविरोधात शिंदे गट कोर्टाचं दार ठोठावणार आहेत ही गोष्ट वेगळी पण नेटकरी मात्र त्याआधीच सुरु झालेत. खुद्द खासदार संजय राऊतांनी एक ट्विट केलंय. संजय राऊतांनी तोच नरहरी झिरवाळांचा फोटो टाकलाय आणि त्यावर लिहीलं, “कब तक छीपोगे गोहातीमे… आना हि पडेगा.. चौपाटीमे..” किती दिवस गुवाहाटीला लपणार? कधी ना कधी तर मुंबईला यावंच लागेल असा याचा सरळ अर्थ होतो.

हे सुद्धा वाचा

2) एकदम ओक्के मधी…

3) एकदम OK…

4) जीवन का वर्णन तीन शब्दो में, ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’

5) “मुंबईत परतल्यावर: काय ते कार्यकर्ते, काय ते बांबू,…”

(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)