Video: अहमदनगरमध्ये मद्यधुंद बाईकस्वाराची शेतकऱ्याला धडक, लोक म्हणाले, अशांना चांगलं चोपलं पाहिजे!

| Updated on: Nov 27, 2021 | 2:44 PM

व्हिडीओ 3 दिवसांपूर्वीचा असून ही घटना शिर्डी-साकूर रस्त्यावरची आहे. या मद्यधुंच चालकाला कसलंही भान नसल्याचं दिसतं, गाडी हेलके मारत असतानाही तो गाडीचा स्पीड वाढवताना दिसत आहे,

Video: अहमदनगरमध्ये मद्यधुंद बाईकस्वाराची शेतकऱ्याला धडक, लोक म्हणाले, अशांना चांगलं चोपलं पाहिजे!
मद्यधुंद बाईकस्वाराची शेतकऱ्याला धडक
Follow us on

अहमदनगर: सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी काही व्हिडीओ तुम्हाला हसवतात, तर काही व्हिडीओ भावनिक करतात, तर काही व्हिडीओ धक्का देतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये एक मद्यधुंद बाईक चालकाने थेट एका शेतकऱ्याला धडक दिली, आणि तिथून पळ काढला. हा व्हिडीओ अहमदनगरच्या शिर्डी-साकुरी रस्त्यावरचा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी या मद्यधुंद बाईक चालकावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहे. (Ahmednagar Drunk biker hit Onion farmer, video goes viral)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण मद्यधुंद अवस्थेत बाईक चालवत आहे. त्याची बाईक रस्त्यावर हेलके खाताना स्पष्ट दिसते. बाईकच्या मागे चालणाऱ्या कार चालकाने याचा सगळा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ 3 दिवसांपूर्वीचा असून ही घटना शिर्डी-साकूर रस्त्यावरची आहे. या मद्यधुंच चालकाला कसलंही भान नसल्याचं दिसतं, गाडी हेलके मारत असतानाही तो गाडीचा स्पीड वाढवताना दिसत आहे, त्याच्या पुढे इतरही बाईकचालक दिसत आहे, त्यामध्ये एक शेतकरी आपला कांदा बाजारात नेताना दिसत आहे. हा तळीराम गाडीचा स्पीड वाढवतो, आणि गाडी थेट या शेतकऱ्याच्या गाडीला मागून धडकवतो. धडक इतकी जोरदार असते की, शेतकऱ्याच्या दुचाकीचा तोल जातो, आणि ती रस्त्यावर घसरत जाते.

पाहा व्हिडीओ:

या घटनेत या शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली, घटनेनंतर या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथं त्याच्यावर उपचार करण्यात आले, पण या मद्यधुंद अवस्थेतील तळीराम तिथून पसार होण्यात यशस्वी झाला. मात्र, या तळीरामाचा अद्याप शोध लागलेला नाही, पोलिसांनीही याला अद्याप गजाआड केलेलं नाही. त्यामुळे दारु पिऊन इतरांच्या जिवाशी खेळणाऱ्याला शिक्षा कधी होणार असाच सवाल आता नागरिक विचारत आहेत.

व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी या माथेफिरु तळीरामाविरोधात संताप व्यक्त केला तर काहींनी व्हिडीओ काढणाऱ्यालाही सुनावलं. सुनील ठाकरे नावाच्या युजरने कमेंट करताना लिहलं की, ‘त्या बाईक चालवणाऱ्यापेक्षा व्हिडिओ शूटिंग करणारा जास्त दोषी आहे.तो पिलेला आहे हे कळाल्यावर पुढे जाऊन शूटिंग करणाऱ्यांनी त्याला अडवायला हवे होते.’ तर चंद्रकांत जाधव नावाचे युजर म्हणाले की, ‘हा दारु स्वस्त झाल्याचा परिणाम, मविआने दारुवरचा कर कमी केल्याने हे घडलं’.

हेही पाहा:

Video: पिल्लाचे रक्षण करणाऱ्यांना हत्तीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, हत्ती खूप हुशार असतात!

Video: स्कुटीची थोडीही मोडतोड न करता, डिकीतील सामान गायब, पाहा चोरांची हातचलाखी!