Video: पिल्लाचे रक्षण करणाऱ्यांना हत्तीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, हत्ती खूप हुशार असतात!

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक हत्तीचं पिल्लू गाढ झोपेत आहे आणि काही मोठे हत्ती त्याच्या जवळ उभे असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की हे सर्व हत्ती मिळून आपल्या पिल्लाचे रक्षण करत आहेत.

Video: पिल्लाचे रक्षण करणाऱ्यांना हत्तीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, हत्ती खूप हुशार असतात!
पिल्लाचे रक्षण करणारे हत्ती

हत्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हत्तीच पिल्लू गाढ झोपेत आहे आणि एक मोठा हत्ती तिथे उभा राहून पहारा देत आहे. सगळ्यांनाच हा व्हिडिओ खूप आवडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे प्राण्यांचे व्हिडिओ अनेकदा तुम्ही पाहिले असतील. काही व्हिडिओ अतिशय गोंडस तसेच धोकादायक असतात. जर तुम्हा सर्वांना तुमचा दिवस अधिक सुंदर बनवायचा असेल तर आता व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात एक गोष्ट नक्कीच येईल की फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही भावना असतात. (Viral Video elephant baby taking a power nap then gentle giant did this watch adorable video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक हत्तीचं पिल्लू गाढ झोपेत आहे आणि काही मोठे हत्ती त्याच्या जवळ उभे असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की हे सर्व हत्ती मिळून आपल्या पिल्लाचे रक्षण करत आहेत. आम्हाला आशा आहे की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सर्वजण इतके गोंडस बोलल्याशिवाय स्वतःला थांबवू शकणार नाहीत.

व्हायरल व्हिडीओ पाहा-

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. शेल्ड्रिक वाइल्डलाइफ ट्रस्ट नावाच्या पेजवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. इथं विविध वयोगटातील हत्ती किती काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक एकमेकांची काळजी घेतात हे पाहणं भारी आहे.

व्हिडिओवर आतापर्यंत लाखो लाईक्स आणि कमेंट्स पाहिल्या असतील. तसेच सोशल मीडिया यूजर्स कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. एका इंस्टाग्राम यूजरने लिहिले की, तुम्ही प्राण्यांसाठी जे काही करता त्यासाठी धन्यवाद. हत्ती खूप चांगले असतात. मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्याच्याकडून खूप काही शिकता येते.” दुसर्‍याने लिहिले, “तो हत्ती खूप सुंदर आहे! काय अद्भुत आहे!” काही यूजर्स असेही आहेत जे व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये इमोजी शेअर करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

हेही पाहा:

Video: स्कुटीची थोडीही मोडतोड न करता, डिकीतील सामान गायब, पाहा चोरांची हातचलाखी!

2 नद्यांच्या संगमातून तयार होतो भारताचा नकाशा, जाणून घ्या आसाममधील अद्भूत ठिकाणाबद्दल!

 

Published On - 1:24 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI