2 नद्यांच्या संगमातून तयार होतो भारताचा नकाशा, जाणून घ्या आसाममधील अद्भूत ठिकाणाबद्दल!

आम्ही तुम्हाला आसाममधील एका खास ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जिथे दोन नद्यांच्या मिलनातून भारताचा नकाशा तयार होतो.

2 नद्यांच्या संगमातून तयार होतो भारताचा नकाशा, जाणून घ्या आसाममधील अद्भूत ठिकाणाबद्दल!
नद्यांच्या संगमावर भारताचा नकाशा

बऱ्याचदा सोशल मीडियावर असं काही पाहायला मिळतं की, जे पुन्हा पुन्हा पाहू वाटतं. आपल्या भारतात अशा अनेक नद्या आहेत, ज्या अतिशय सुंदर आहेत. आज आम्ही तुम्हाला आसाममधील एका खास ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जिथे दोन नद्यांच्या मिलनातून भारताचा नकाशा तयार होतो. आसामच्या बोंगईगावाजवळ ब्रह्मपुत्रा नदीला मिळणाऱ्या चंपाबती नदीबद्दल बोलत आहोत, इथं हा संगम अगदी भारताच्या नकाशासारखी दिसतो. जर तुम्ही सर्वांनी हा हा पाहिला असेल, तर तुम्ही एवढेच म्हणाल की, ही भूगोलातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे, जी तुम्ही सर्वांनी यापूर्वी कधीही पाहिली नसेल. माहितीसाठी, आसामीमध्ये याला ‘चापोरी’ म्हणून ओळखले जाते. (Amazing Place of Assam where the meeting of two rivers makes the map of India)

हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. एरिक सोल्हेमच्या पेजवर तुम्ही सर्वजण हा फोटो पाहू शकता. त्यांनी या नदीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये भारताचा नकाशा दिसत आहे. फोटो शेअर करताना त्यांनी एक अतिशय सुंदर कॅप्शनही दिले आहे. त्यांनी लिहिले – आसाममधील बोंगईगाव जिथं एक जागा आहे, जिथं चंपावती नदी ब्रह्मपुत्रेला मिळते. तो अगदी भारताच्या नकाशासारखा दिसतो. अविश्वसनीय आणि सुंदर भारत!

फोटो पाहा:

त्यांच्या या पोस्टला सगळ्यांनाच खूप पसंती मिळत आहे. या फोटोवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत, तसेच हजारो लोकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘मला कधी कधी आश्चर्य वाटते. कारण मला इतके ज्ञान नाही, पण तुमच्या ट्विटवरून भारताविषयी जाणून घेणे खूप आनंददायक आहे. हा फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘निसर्ग सुंदर आहे.’लोक यावर इमोटिकॉन्सही शेअर करत आहेत.

हेही पाहा:

बादशाहचं ‘जुगनू’वर डान्सिंग डॅडचा जबरदस्त डान्स, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी खूश

Video: न्यूडल्स खाण्याच्या स्पर्धेत कुत्र्याने मालकाला हरवलं, कुत्र्याच्या हुशारीचं नेटकऱ्यांकडून कौतुक

Video: अंगाला जखमा, हातात काठी, गळ्यात सलाईनची बाटली, तरीही लग्नात जबरदस्त डान्स, पाहा लग्नातील भन्नाट व्हिडीओ

 

Published On - 12:04 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI