Video: अंगाला जखमा, हातात काठी, गळ्यात सलाईनची बाटली, तरीही लग्नात जबरदस्त डान्स, पाहा लग्नातील भन्नाट व्हिडीओ

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे जो विचित्र पद्धतीने नाचताना दिसत आहे आणि लोक गोंधळात पडले आहेत की, अशा विचित्र परिस्थितीत हा माणूस हॉस्पिटलच्या बेडवरून उठला कसा आणि थेट डान्स करण्यासाठी पोहोचला कसा? या माणसाच्या शरीराला अनेक फ्रॅक्चर्स झालेले आहे

Video: अंगाला जखमा, हातात काठी, गळ्यात सलाईनची बाटली, तरीही लग्नात जबरदस्त डान्स, पाहा लग्नातील भन्नाट व्हिडीओ
अंगाला फ्रॅक्चर असतानाही डान्स करणारा व्यक्ती

तुम्हाला सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ दिसतील. त्यातील काही व्हिडीओ इतके भन्नाट असतात, की आपण पोट धरुन हसतो, सध्या आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो खूप मजेशीरही आहे. 30 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या कमेंट्स शेअर करत आहेत. (Amazing Funny Dance Man dancing with bandage and stick with saline bottle Funny Video)

व्हिडिओमध्ये एक मिरवणूक दिसत आहे, जिथे अनेक लोक नाचताना आणि त्या क्षणाचा खूप आनंद घेताना दिसत आहेत. हा लग्नाचा व्हिडीओ कुठचा आहे हे अद्याप समजू शकलेलं नसलं, तरी सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे जो विचित्र पद्धतीने नाचताना दिसत आहे आणि लोक गोंधळात पडले आहेत की, अशा विचित्र परिस्थितीत हा माणूस हॉस्पिटलच्या बेडवरून उठला कसा आणि थेट डान्स करण्यासाठी पोहोचला कसा? या माणसाच्या शरीराला अनेक फ्रॅक्चर्स झालेले आहे, गळ्यात सलाईनची बॉटेल आहे, तरीही हा नाचण्यात दंग आहे.

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आपण सर्वजण @Dr_Kopite नावाच्या अकांऊटवर हा व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा तुमचा अपघात होतो पण तरीही तुम्हाला मित्राच्या लग्नात नाचायचं असतं. ‘ या व्हिडीओ प्रत्येकजण आनंदाने उड्या मारत आहे. व्हिडिओमध्ये जिथे बाकीचे लोकांनी नवेकोरे कपडे घातलेले दिसत आहेत, तिथे हा व्यक्ती आहे ज्याच्या हातात काठी आहे आणि त्याच्या डोक्यावर पट्टी बांधलेली आहे. या व्यक्तीच्या डोक्याशिवाय हात आणि पायालाही जखमा झाल्या आहेत. पण या व्यक्तीने यापैकी कोणतीही जखम आपल्या नृत्याच्या आड येऊ दिली नाही.

व्हायरल व्हिडीओ पाहा:

व्हिडिओमध्ये मजेशीर गोष्ट म्हणजे इतक्या जखमा झाल्यानंतरही त्याच्या गळ्यात सलाईनची बाटली लटकलेली दिसत आहे आणि तो जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्व सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले असून, ते एकत्र मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘आपला भाऊ, जो एवढ्या वाईट अवस्थेतही असा डान्स करतो’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘हा अप्रतिम व्हिडिओ आहे’ तिसऱ्या यूजरने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, ‘अशा परिस्थितीत कोण डान्स करतो, या व्यक्तीची पत्नी त्याला सोडून पळून गेल्याचे दिसते आहे’ या व्हिडिओवर अनेक इमोजीही पाहायला मिळत आहेत.

हेही पाहा:

Video: चिमुरड्यांनी एकमेकांना दिलेली टस्सल पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल, भांडण सोशल मीडियावर व्हायरल

Video: पिलांच्या रक्षणासाठी आई काय करते पाहा, मादा अजगराचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

 

Published On - 9:30 am, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI