Video: माणिके मागे हिते वर बौद्ध भिक्षुंचा भन्नाट डान्स, लोक म्हणाले, संगीताला धर्म आणि भाषा नसते!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन भिक्षू 'माणिक मागे हिते'च्या तालावर नाचताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ती डान्स स्टेप्स चोख करताना दाखवली आहे आणि त्यांचे एक्सप्रेशन अगदी योग्य आहेत.

Video: माणिके मागे हिते वर बौद्ध भिक्षुंचा भन्नाट डान्स, लोक म्हणाले, संगीताला धर्म आणि भाषा नसते!
माणिके मागे हितेवर बौद्ध भिक्षुंचा डान्स
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 12:03 PM

श्रीलंकन ​​गायिका योहानी डिलोका डी सिल्वाने काही महिन्यांपूर्वी तिच्या यूट्यूबवर मणिके मागे हिते हे गाणे अपलोड केले होतं. मात्र, या गाण्याची क्रेझ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता त्याचे मीम्सही खूप पाहायला मिळत आहेत. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट रिल्स बनवत आहेत. अनेकजण लिपसिंगच्या माध्यमातून गाण्याचे रिमेक बनवत आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटींसह इंस्टाग्राम युजर्स या गाण्याचे शॉर्ट व्हिडीओ बनवत आहेत आणि आता या गाण्याने बौद्ध भिक्षुंनाही नाचायला भाग पाडले आहे. सध्या सोशल मीडियावर बौद्ध भिक्षुंचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याला नेटकऱ्यांना खूप पसंती दिली जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन भिक्षू ‘माणिक मागे हिते’च्या तालावर नाचताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ती डान्स स्टेप्स चोख करताना दाखवली आहे आणि त्यांचे एक्सप्रेशन अगदी योग्य आहेत. भिक्षुंच्या नृत्यातून एक गोष्ट खरी ठरली आहे की, संगीताला भाषा, वंश, धर्म यांच्या सीमा नसतात. व्हिडिओला आतापर्यंत 9000 हून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांना यांचा डान्स आवडला आणि त्यांनी हार्ट-फायर इमोजी पोस्ट केले.

हा व्हिडीओ पाहा

इतकंच नाही तर आणखी एका व्हिडिओमध्ये या साधूंचा एक गट सूर्यवंशी चित्रपटातील ‘आयला रे आला’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही लोक अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत. सोशल मीडियावर त्याला त्याच्या यूजर्सकडून चांगलीच पसंती मिळत आहे. त्याच्या डान्स स्टेप्सचे लोकांनी भरभरून कौतुक केले आहे. युजर्सनी अनेक प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, “वाह इतका दमदार डान्स.” दुसर्‍या युजरने कमेंट केली, ‘तुम्ही लोक प्रत्येक वेळी छान आहात. तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘फुल ऑन रॉक प्रत्येकजण माझी आवडती व्यक्ती आहे.

इंस्टाग्रामवर हिमालय मॉंक नावाच्या पेजवर या बौद्ध अनुयायांचे अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर या पेजवर रील व्यतिरिक्त अनेक सुंदर फोटो आणि इतर व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

हेही पाहा:

Video | केस विस्कटलेले, रस्त्यावर जेवत बसलेली, इंग्रजी बोलणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Viral: टेकडीवरच्या अंध वळणावर बाईक पळवण्याचा प्रयत्न अंगाशी, पाहा धक्कादायक Video