Motivational : आयपॅड प्रो, सॅमसंग गॅलेक्सी टॅब, लॅपटॉप आणि बरंच काही आहे या रिक्षात! आनंद महिंद्रांनी शेअर केला Video

उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडिया(Social Media)वर सक्रीय असलेले म्हणजेच एक अॅक्टिव्ह यूझर म्हणूनही ओळखले जातात. आता त्यांनी असाच एक व्हिडिओ ट्विट केलाय, जो अत्यंत प्रेरणादायी आहे.

Motivational : आयपॅड प्रो, सॅमसंग गॅलेक्सी टॅब, लॅपटॉप आणि बरंच काही आहे या रिक्षात! आनंद महिंद्रांनी शेअर केला Video
आनंद महिंद्रा/अण्णा दुराई
| Updated on: Jan 23, 2022 | 4:09 PM

Motivational Video Twitted by Anand Mahindra : उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडिया(Social Media)वर सक्रीय असलेले म्हणजेच एक अॅक्टिव्ह यूझर म्हणूनही ओळखले जातात. आपल्या पोस्ट किंवा ट्विटमधून ते नेहमीच काहीतरी वेगळं आणि प्रेरणादायी अशा बाबी शेअर (Share) करत असतात. कधी निसर्गसौंदर्य, कधी व्यवसायाशी संबंधित तर कधी शिकण्यासारखं असं काहीतरी व्हिडिओ किंवा फोटोच्या माध्यमातून ते आपल्यासमोर मांडत असतात. मग नेटकरीही त्यांच्या पोस्ट व्हायरल करत असतात. आता त्यांनी असाच एक व्हिडिओ ट्विट केलाय, जो अत्यंत प्रेरणादायी आहे. आनंद महिंद्रा स्वत: एक उद्योगपती आहेत. त्याशीच निगडीत असा हा व्हिडिओ आहे. प्रत्येकालाच त्यानं प्रेरणा मिळेल.

‘हा तर मॅनेजमेंटचा प्राध्यापक’

एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय. वास्तविक The Better Indiaनं हा व्हिडिओ ट्विट केला. त्यांचा हा व्हिडिओ आनंद महिंद्रांनी रिट्विट केला. हा एका आधुनिक रिक्षाचालकाचा व्हिडिओ आहे, ज्याला ग्राहकहित, ग्राहकांच्या गरजांची जाण आहे. महिंद्रांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय, की जर एमबीएच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यासोबत एक दिवस घालवला तर तो ग्राहक अनुभव व्यवस्थापनाचा एक छोटासा अभ्यासक्रमच असेल. हा व्यक्ती फक्त ऑटो ड्रायव्हरच नाही, तर मॅनेजमेंटचा प्राध्यापक आहे.

इंग्लिशमधून देतो माहिती

अण्णा दुराई असं या ऑटो ड्रायव्हरचं नाव आहे. द बेटर इंडियानं म्हटलंय, अण्णा दुराईकडे मॅनेजमेंटची अशी कोणतीही व्यावसायिक पदवी नाही. पण ‘ग्राहक हा राजा’ हे त्याला पहिल्या दिवसापासूनच कळलं होतं. तर या रिक्षाचालकाच्या रिक्षात अत्याधुनिक अशा सुविधा आहेत. तो स्वत: याबद्दल इंग्लिशमधून माहिती देतो. आयपॅड प्रो, सॅमसंग गॅलेक्सी टॅब, लॅपटॉप आदी सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याचं तो सांगतो. विशेष म्हणजे या छोट्याशा रिक्षात छोटंस फ्रीजही आहे. यात पाणी ज्यूस आदी गोष्टी ठेवता येतात. याशिवायही अनेक सुविधा आहेत. त्यामुळे आनंद महिंद्रा यांनी म्हटल्याप्रमाणं तो एक मॅनेजमेंटचा प्राध्यापकच म्हणायला हवं.

Viral : संकटातही विचलित न होता कसं पडायचं बाहेर? या Videoतून खूप काही शिकायला मिळेल

Video : गोरखा जवानाचा पारंपरिक खुकरी डान्स सोशल मीडियावर Viral

Video : Nach Meri Raniवर आई-मुलाच्या जोडीचा जबरदस्त डान्स, नोरा फतेहीही होईल प्रभावित