आनंद महिंद्रा यांनी अलिबागमधल्या सूर्यास्ताचा सुंदर फोटो केला ट्विट, नेटिझन्सनीही Share केले अप्रतिम Photos

सोशल मीडिया (Social Media) एक असं व्यासपीठ आहे जिथं कोणताही व्हिडिओ (Video) किंवा पोस्ट (Post) येताच तो व्हायरल (Viral) होतो. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सूर्यास्ताचा एक सुंदर फोटो पोस्ट केलाय. 11 जानेवारीला फोटो पोस्ट केला आणि तो पटकन व्हायरल झाला.

आनंद महिंद्रा यांनी अलिबागमधल्या सूर्यास्ताचा सुंदर फोटो केला ट्विट, नेटिझन्सनीही Share केले अप्रतिम Photos
आनंद महिंद्रा

सोशल मीडिया (Social Media) एक असं व्यासपीठ आहे जिथं कोणताही व्हिडिओ (Video) किंवा पोस्ट (Post) येताच तो व्हायरल (Viral) होतो. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते दररोज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काही ना काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतातच. त्यांच्या काही पोस्ट मजेदार तर काही प्रेरणादायी आहेत. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सूर्यास्ताचा एक सुंदर फोटो पोस्ट केलाय. 11 जानेवारीला आनंद महिंद्रा यांनी एका सुंदर सूर्यास्ताचा फोटो पोस्ट केला आणि तो पटकन व्हायरल झाला.

सूर्यास्ताची तुलना पेंटिंगशी

अलिबागमधला हा सूर्यास्त होता. महिंद्रांनी या दृश्याची तुलना अमेरिकन चित्रकार मार्क रोथको यांच्या पेंटिंगशी केलीय. सूर्यास्त आणि पेंटिंग दोन्हीचे रंग पॅलेट अगदी सारखेच होते. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सर्वांनाच आवडली. यासोबतच लोक लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

यूझर्सनीही जोडले फोटो

फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, की काही दिवसांपूर्वी, मुंबईच्या स्वच्छ आकाश आणि सूर्यास्ताच्या सुंदर छायाचित्रांनी सोशल मीडिया भरला होता. डावीकडील चित्र अलिबागमधल्या कुठल्यातरी ठिकाणचे आहे. रोथको पेंटिंग (उजवीकडे) आहे. दरम्यान, सीईओंनी शेअर केलेल्या सूर्यास्ताच्या फोटोनं जगभरातल्या नेत्रदीपक सूर्यास्तांचे फोटो यूझर्सनी जोडले आहेत. दार्जिलिंगपासून सिडनीपर्यंत नेटिझन्सनी निसर्गाच्या सुंदरतेची झलक या फोटोंमधून दाखवलीय. अगदी आनंद महिंद्रा यांनीही त्याची दखल घेतली आणि त्याला ‘वर्ल्ड कप ऑफ सनसेट’ असं संबोधलं.

फोटो शेअर

कर्नाटकातल्या हुबळी इथलं आणखी एक सुंदर छायाचित्र शेअर करत त्यांनी त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, व्वा! सूर्यास्ताच्या ‘विश्वचषकात’ रूपांतर होत आहे. अशावेळी सर्व संघांचं स्वागत आहे.

महिला न्यायाधीशानं घेतलेलं कैद्याचं चुंबन कॅमेऱ्यात कैद, Video सोशल मीडियावर Viral

Viral : थंडीपासून वाचण्यासाठी अवलियानं केलाय अजब जुगाड, VIDEO पाहून हसतच राहाल

अनोळखी व्यक्तीच्या घरी डिनरला गेली महिला, लॉकडाऊन लागला आणि मग…

Published On - 11:54 am, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI