Viral Video: आजीच्या सांगण्यावरुन कुत्र्याचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर उड्या

आपल्या सर्वांना माहित आहे की कुत्रा हा जगातील मानवाच्या सर्वात जवळचा प्राणी मानला जातो. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मालकिन आणि कुत्रा एकत्र डान्स करताना दिसत आहेत.

Viral Video: आजीच्या सांगण्यावरुन कुत्र्याचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर उड्या
आजीच्या इशाऱ्यावर कुत्र्याचा भन्नाट डान्स
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 5:49 PM

सोशल मीडिया प्राण्यांशी संबंधित गोंडस व्हिडिओंनी भरलेला आहे. काही लोकांना प्राण्यांपासून दूर राहणे आवडते, तर काहींना त्यांच्याशी इतके जोडलेले असतात की, ते त्यांच्यांपासून दूर राहू शकत नाहीत. बहुतेक लोकांना कुत्री खूप आवडतात. सदस्य म्हणून ते कुत्रेही घरात पाळले जातात. माणूस आणि कुत्र्याचं नातं सगळ्यांनाच आवडतं. सध्या एका कुत्र्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. जे पाहून तुमचाही दिवस जाईल.

आपल्या सर्वांना माहित आहे की कुत्रा हा जगातील मानवाच्या सर्वात जवळचा प्राणी मानला जातो. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मालकिन आणि कुत्रा एकत्र डान्स करताना दिसत आहेत. ज्यामध्ये कुत्रा आपल्या मालकिनच्या सांगण्यावरून अतिशय आकर्षक आणि जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्हील चेअरवर बसलेली एक वृद्ध महिला टाळ्या वाजवत आहे आणि तिच्यासमोर बसलेला कुत्रा त्याच धूनवर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ज्याला आतापर्यंत 57 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडिओ पाहा

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @ProfmakeUsmile नावाच्या ट्विटर पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत एक गोंडस कॅप्शनही लिहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. लोक हा व्हिडिओ फक्त लाइक करत नाहीत तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘मी असा डान्सही करू शकत नाही.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘स्त्री आणि कुत्र्याचे बॉन्डिंग पाहण्यासारखे आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हा कुत्रा खूप गोंडस आहे. मला हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघायला आवडतो.” याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, याआधीही कुत्र्याच्या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक छोटा कुत्रा त्याच्या मालकासह डान्स करत होता. त्याचा गुरु जसा नाचत असतो तसा कुत्राही त्याची नक्कल करत असतो.

हेही पाहा:

बरमोडा घालून बँकेत आल्याने SBI ने खातेदाराला बाहेर काढलं, नेटकरी म्हणाले, कसलेही नियम घालणाऱ्या SBI मधील खाती बंद करा!

Viral: घरात घुसला, सायकल उचलली, आणि धूम ठोकली, लोक म्हणाले, याला म्हणतात भुरटा चोर!