अजब नवरा, गजब काम, 40 लिटर दुधाने आंघोळ करुन घटस्फोटाच सेलिब्रेशन, VIDEO

अशाच प्रकारच्या घटनेत हरियाणात एका व्यक्तीने मागच्यावर्षी भव्य पार्टी दिली होती. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झालेला आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला. हरियाणात राहणाऱ्या मंजीतच 2020 साली कोमल बरोबर लग्न झालेलं.

अजब नवरा, गजब काम, 40 लिटर दुधाने आंघोळ करुन घटस्फोटाच सेलिब्रेशन, VIDEO
Divorce Celebration
| Updated on: Jul 15, 2025 | 12:44 PM

असमच्या नलबाडी जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर दूधाने आंघोळ करुन स्वातंत्र्याच सेलिब्रेशन केलं. त्याने त्याच्या या कृतीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. माणिक अली नावाचा हा व्यक्ती पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर खूप आनंदी होता. पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते. ती सतत पळून जायची असं त्याचं म्हणणं आहे. आजपासून मी स्वतंत्र आहे, असं अली व्हिडिओमध्ये बोलताना दिसतो. बोरोलियापाराचा रहिवासी असलेल्या अलीने दावा केला की, त्याची पत्नी दोनवेळा पळून गेलेली. पदरात मुलगी असल्याने अलीने परत येण्यासाठी तिची समजूत काढली होती.

नात्यात विश्वास नसल्याने त्याने कायदेशीर मार्ग अवलंबला. अधिकृतरित्या घटस्फोट झाल्यानंतर अलीने आपल्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन केलं. त्याने चार बादल्यांमध्ये 40 लिटर दूध एकत्र केलं आणि त्याने आंघोळ केली. या दरम्यान तो सतत मी स्वतंत्र आहे, स्वतंत्र आहे असं बोलत होता.

40 लिटर दूधाने आंघोळ

रिपोर्टनुसार अलीने 40 लिटर दूधाने आंघोळ केली. अशाच प्रकारच्या घटनेत हरियाणात एका व्यक्तीने मागच्यावर्षी भव्य पार्टी दिली होती. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झालेला आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला. हरियाणात राहणाऱ्या मंजीतच 2020 साली कोमल बरोबर लग्न झालेलं. 2024 साली घटस्फोटाने या लग्नाचा शेवट झाला. मंजीतने हा प्रसंग एका भव्य समांरभाने सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतलेला.


घटस्फोटाच्या तारखेच पण पोस्टर

पार्टीमध्ये मंजीत आणि कोमलच्या लग्नाच्या फोटोसोबत घटस्फोटाच्या तारखेच पण पोस्टर लावलेलं. या अनोख्या प्रसंगी बरेच केक ठेवण्यात आले होते. मंजीत याचं सेलिब्रेशन करताना केक कापताना दिसलेला. तिथे एक पुतळा सुद्धा होता. हा पुतळा मंजीतच्या पूर्व पत्नीचा होता, ज्याच्यासोबत त्याने फोटो काढला. मंजीतच्या घटस्फोट पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला.