Video: लग्नात वराने वधूच्या हातात दिली बंदूक, फायरिंग केल्यानंतर काय घडलं पाहा!

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, वधू आणि वर आणि वऱ्हाडी मंडळी दिसत आहेत. तेवढ्यात कुणीतरी वराच्या हातात बंदूक आणून देतो, वर ती बंदू वधूच्या हातात देतो

Video: लग्नात वराने वधूच्या हातात दिली बंदूक, फायरिंग केल्यानंतर काय घडलं पाहा!
दूकीतून गोळी सुटल्याच्या आवाजाने वधू थोडी घाबरलेलीही दिसत आहे.
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 10:38 AM

जसं लग्न तशा परंपरा आणि तशा प्रथा. कुणी ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढतं, कुणी डीजेचा गोंगाट करतं, कुणी पारंपरिक वाद्य आणतं, कुणी हजारोंचे फटाफे फोडतं, लग्नातही अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. काही लग्नात गोळीबार झालेलाही तुम्ही पाहिला असेल, कधीकधी आपलं शान दाखवण्यासाठी केलेला हा गोळीबार वऱ्हाडी मंडळींच्या जीवावर बेतल्याचेही प्रकार घडले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात वर बंदूक वधूच्या हातात देऊन हवेत गोळीबार करताना दिसत आहेत. ( At the wedding, the bride and groom fired into the air with guns )

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, वधू आणि वर आणि वऱ्हाडी मंडळी दिसत आहेत. तेवढ्यात कुणीतरी वराच्या हातात बंदूक आणून देतो, वर ती बंदू वधूच्या हातात देतो, आणि त्यानंतर बंदुकीचं तोंड आकाशाच्या दिशेने करतो, आणि त्यानंतर एकामागोमाग एक 2 राऊड फायर करतो. बंदूकीतून गोळी सुटल्याच्या आवाजाने वधू थोडी घाबरलेलीही दिसत आहे. काही सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, तुमच्या माहितीसाठी, लग्नात केल्या जाणाऱ्या अशा फायरिंगवर कायद्याने बंदी आहे. अशा फायरिंगमध्ये अनेकदा लग्नामध्ये वऱ्हाडी मंडळी जखमी झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात वधूच्या हाताने हवेत फायरिंग करण्यात आलं होतं, त्यांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सध्या या व्हिडीओ व्हायरल होत असला तरी त्यावर अनेक लोक राग व्यक्त करताना दिसत आहे. साहिल नावाच्या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेही पाहा:

Video | हवाई सुंदरीचा विमानात बहारदार डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Aryan Khan drug case | रेव्ह पार्टी-ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात, चर्चा मात्र एका वेगळ्या फोटोची, नेमका प्रकार काय ?