Baba Vanga Prediction : नोव्हेंबर महिन्यात अंतराळातून संकट? बाबा वेंगाची ती हादरवणारी भविष्यवाणी

Baba Vanga Prediction : 3I/ATLAS ही रहस्यमय वस्तू नोव्हेंबर 2025 मध्ये सूर्याच्या अगदी जवळ असेल. त्यावेळी अंतराळातून मोठे संकट येऊ घातले आहे. बाबा वेंगाने या संकटाविषयी अगोदरच चाहूल दिली आहे. काय आहे ते संकट?

Baba Vanga Prediction : नोव्हेंबर महिन्यात अंतराळातून संकट? बाबा वेंगाची ती हादरवणारी भविष्यवाणी
बाब वेंगाचे ते भाकीत
| Updated on: Jul 29, 2025 | 2:32 PM

शास्त्रज्ञांचा चमू आणि जागतिक माध्यमात एका चर्चेने सध्या धुमाकूळ घातला आहे. 3I/ATLAS ही रहस्यमय वस्तू अंतराळात फिरताना दिसली आहे. तिच्याविषयी खगोलशास्त्रज्ञांना साशंकता आहे. तिच्याविषयी काही वर्षांपूर्वीच प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिने भाकीत नोंदवले आहे. ही मानव जातीसाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगण्यात येत आहे. काय आहे त्यामागील सत्य?

1,30,000 ताशी वेगाने सूर्याकडे

या 1 जुलै रोजी ही रहस्यमयी वस्तू अंतराळात पहिल्यांदा टिपल्या गेली. शास्त्रज्ञांच्या मते ती, 1.3 लाख ताशी वेगाने सूर्याकडे येत आहे. तिचा आकार जवळपास 15 मील इतका आहे. म्हणजे ही वस्तू मॅनहटन शहरापेक्षा मोठी आहे. विशेष म्हणजे ही वस्तू आपल्या सौरमालेतील नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी सौरमालिकेतील आहे.

हे एलियनचे यान?

इंटरस्टेलर रिसर्चर्स आणि हार्वर्ड खगोलभौतिकशास्त्रज्ञ एव्ही लोएब यांनी दावा केला आहे की, हा काही धुमकेतू नाही. तर एक अंतराळातील जासूद, हेरगिरी करणारे यान असण्याची दाट शक्यता आहे. हे एक एलियन स्पेसशिप असण्याची शक्यता अनेक जण वर्तवत आहेत. 3I/ATLAS चा वेग, दिशा आणि तिचा मार्ग एखादा धुमकेतू अथवा इतर भरकटणाऱ्या वस्तूपेक्षा वेगळा आहे. ही रहस्यमयी वस्तू अगोदर गुरू, मग मंगळ आणि शुक्राजवळून जात पुढे नोव्हेंबर महिन्यात सूर्याच्या अगदी जवळ जाईल आणि पृथ्वीच्या टप्प्यातून निसटेल.

एलियंस करणार पृथ्वीर हल्ला?

लोएबच्या मते, ते गुप्त होतील असे भासवत आहेत. पण एलियन्स, हे परग्रही काहीतरी रणनीती आखत आहेत. जेणेकरून ते एखाद्या ग्रहावर लपू शकतील. त्यांची योजना तशी असू शकते. डॉर्क फॉरेस्ट थिअरी नुसार, हे परग्रही नेहमी इतर संस्कृतीवर गुप्त नजर ठेवातात. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ते एखादा तळ सुद्धा शोधत असतील.

बाबा वेंगाची भविष्यवाणी काय?

प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगाने काही वर्षांपूर्वी मनुष्याचा आणि एलियन्स, परग्रहींचा सामना होणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. 2030 या सालापूर्वी मानव आणि एलियन्स यांचा संपर्क होईल. पण सुरुवातीला त्यांच्या संघर्ष होण्याची भीती तिने वर्तवली होती. आता 3I/ATLAS ही वस्तू सौरमालेत अचानक घुसल्याने शास्त्रज्ञांना तिच्याविषयी उत्सुकता वाढली आहे.