ना झिंगाट, ना नागिण, लग्नातील नवऱ्याचा हा डान्स पाहुन तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’

लग्नातील एका डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. मात्र, यात आपल्याकडच्या सारखं झिंगाट डान्स कुणी करत नाही आहे, तर तालबद्धरित्या पाहुणा मायकल जॅक्सनसारखे नाचत आहेत.

ना झिंगाट, ना नागिण, लग्नातील नवऱ्याचा हा डान्स पाहुन तुम्हीही म्हणाल, क्या बात है!
वराचा वऱ्हाड्यांसोबत भन्नाट डान्स
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 10:21 AM

जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या लग्नाचा दिवस हा सर्वात खास असतो. हा दिवस खास बनवण्यासाठी काहीजण ढिंच्याक डान्स करत असतात. अनोखा डान्स करणारे हे लोक प्रत्येक लग्नालाच खास बनवत असतात. असाच असाच एका डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. मात्र, यात आपल्याकडच्या सारखं झिंगाट डान्स कुणी करत नाही आहे, तर तालबद्धरित्या पाहुणा मायकल जॅक्सनसारखे नाचत आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये एक नवरा मुलगा त्याच्या काही मित्रांसोबत नाचत आहे. सुटाबुटातला हा नवरा मुलगा आधी पाहुण्यांमद्ये पोहचतो. त्यानंतर जमलेले लोक एकच टाळ्यांचा जल्लोष करतात. नंतर त्या पाहुण्यापैकी काही लोक या मुलाला सोबत करण्यासाठी नाचू लागतात.

नवऱ्या मुलाला नाचताना पाहून काही लोकांच्या अंगातील डान्सही बाहेर निघू लागतो. आणि हळूहळू प्रत्येक जण जोमाने नाचू लागतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी कमेंट्सचा पाऊसच पडला. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला. आपल्याकडं लग्नात झिंगाड डान्स, नाहीतर नागिण डान्स सहज पाहायला मिळतो. मात्र, हा डान्स अतिशय वेगळा आणि सुंदर आहे. त्यामुळेच तो लोकांना चांगलाच आवडलेला दिसतो आहे.

पाहा व्हिडीओ:

मोनिक एडवर्ड्सने हा व्हिडिओ तिच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. तसेच, हा व्हिडिओ मुळात @GoodNewsCorres1 ने शेअर केला होता. सोशल मीडियावर शेअर केलेला हा डान्स व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. हेच कारण आहे की अनेक युजर्सनी हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे शेअर केला आहे. बातमी लिहीपर्यंत हा व्हिडिओ 54 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.