महिलेला विमानतळावर एकांतात नेलं, मग पुरुषांच्या वॉशरुममध्ये नेऊन… खळबळजनक घटना, नेमकं काय घडलं?

आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका साउथ कोरियन महिलेने केलेल्या तक्रारीनंतर प्रकरण उघड झाले आहे. एका कार्मचाऱ्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

महिलेला विमानतळावर एकांतात नेलं, मग पुरुषांच्या वॉशरुममध्ये नेऊन... खळबळजनक घटना, नेमकं काय घडलं?
Bengaluru
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 22, 2026 | 2:30 PM

आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक गंभीर आणि चिंताजनक प्रकरण समोर आले आहे. एका विदेशी महिलेने विमानतळ कर्मचाऱ्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. ही घटना १९ जानेवारी २०२६ रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. पीडिता दक्षिण कोरियाची नागरिक आहे. आता नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर…

ही घटना बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली आहे. साउथ कोरियेच्या महिलेत्या तक्रारीनुसार, ती इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून आपली फ्लाइट पकडण्यासाठी टर्मिनलमध्ये पुढे जात होती. त्याचवेळी एक पुरुष कर्मचारी तिच्याजवळ आला आणि तिची तिकीट तपासणी करु लागला. आरोपीने महिलेला सांगितले की, तिच्या चेक-इन बॅगेजमध्ये बीपचा आवाज आला आहे, ज्यामुळे सुरक्षा संबंधित समस्या उद्भवू शकते.

वेगळे तपासण्याच्या बहाण्याने एकांत ठिकाणी नेले

महिलेने सांगितले की, कर्मचाऱ्याने म्हटले की, जर ती सामान्य स्क्रीनिंग काउंटरवर परत गेली तर वेळ जास्त लागेल आणि तिची फ्लाइट सुटू शकते. या बहाण्याने आरोपीने तिला वेगळ्या तपासणीसाठी टर्मिनलच्या एका भागात नेले, जिथे पुरुषांचे वॉशरूम होते. तक्रारीत म्हटले आहे की, हे ठिकाण तुलनेने शांत होते.

परवानगीशिवाय शारीरिक स्पर्शाचा आरोप

पीडितेने आरोप केला की, तिथे आरोपीने तिच्या परवानगीशिवाय तिच्या पाठीला स्पर्श केला आणि वारंवार छातीला स्पर्श करू लागला. त्यानंतर त्याने महिलेला फिरण्यास सांगितले आणि मागून स्पर्श केला. जेव्हा महिलेने विरोध केला तेव्हा आरोपीने तिला मिठी मारली, “थँक यू” म्हटले आणि तो तिथून निघून गेला. या घटनेमुळे महिलेला मानसिकदृष्ट्या खूप मोठा धक्का बसला.

तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली

घटनेनंतर लगेच महिलेने विमानतळावर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रकरण सांगितले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित कारवाई करून आरोपी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीची ओळख आणि पोलिसांची कारवाई

पोलिसांनी आरोपीची ओळख अपान अहमद अशी केली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे आणि प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिस हेही तपासत आहेत की, आरोपीने यापूर्वी इतर प्रवाशांसोबत असा वर्तन केले आहे का आणि सुरक्षा प्रक्रियांचा दुरुपयोग कसा केला गेला.