VIDEO | भंडाऱ्यात एकाच घरी निघाले तीन विषारी साप, पाहा थरारक व्हिडीओ

एकाच घरी तीन विषारी साप आढळ्याने घर मालकाची भंबेरी उडल्याची घटना विदर्भातील भंडारा जिल्ह्यात घडली (Three Poisonous Snakes)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:02 PM, 18 Mar 2021
VIDEO | भंडाऱ्यात एकाच घरी निघाले तीन विषारी साप, पाहा थरारक व्हिडीओ
Bhandara Snake

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक थरारक व्हिडीओ पुढे आला आहे (Three Poisonous Snakes Found In A House). एकाच घरी तीन विषारी साप आढळ्याने घर मालकाची भंबेरी उडल्याची घटना विदर्भातील भंडारा जिल्ह्यात घडली. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील पालांदुर येथे ही घटना घडली आहे. पालांदुर येथील ब्राम्हण मोहल्लातील डॉ. प्रशांत फुलझले यांच्या राहत्या घरी एकाच वेळी 3 नाग निघाले (Bhandara News Three Poisonous Snakes Found In A House).

तीन साप बघताच घरातील मंडळींची भंबेरी उडाली. घाबरलेल्या कुटुंबाने अखेर सर्प मित्रांना पाचारण करण्यात आले. 3 नाग तेही वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्यामुळे सर्प मित्रांनीही त्यांना पकडण्यात अडचण येत होती. अखेर सर्प मित्रांच्या 4 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर या तिन्ही नागांना रेस्क्यू करण्यात आले आहे. त्यांना किटाळी येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

पाहा या तीन सापांचा थरारक व्हिडीओ –

Bhandara News Three Poisonous Snakes Found In A House

संबंधित बातम्या :

VIDEO | लहान भाऊ चिडला, मोठ्या भावाने काय केलं?, जबाबदारी शिकवणारा ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहाच !

VIDEO: गुडघ्यावर फाटलेली जीन्स, पायात गमबूट, अशा महिला काय संस्कार देणार; भाजपच्या मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान खेळाडूचा मृत्यू; फोटोंमधून पाहा धोकादायक खेळ

VIDEO : तरुणीची पॅराग्लायडिंग करताना याचना, खाली उतारा म्हणत अक्षरक्ष: रडली ! व्हिडीओ बघून तुम्ही प्रचंड हसाल