VIDEO | लहान भाऊ चिडला, मोठ्या भावाने काय केलं?, जबाबदारी शिकवणारा ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहाच !

मोठ्या भावावर घरच्यांची, लहान भावाची तसेच इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात. (big brother small brother viral video)

VIDEO | लहान भाऊ चिडला, मोठ्या भावाने काय केलं?, जबाबदारी शिकवणारा 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच !
मोठ्या भावाने आपल्या लहान भावाला अशा प्रकारे शांत राहण्यासाठी दीर्घ श्वास गेण्यास सांगितले.
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 8:41 PM

मुंबई : मोठा भाऊ असणं खूप दिलासादायक असतं. काहीजरी अडचण आली, तर आपण हक्काने आपल्या मोठ्या भावाला सांगतो. पण मोठा भाऊ असणं हे वाटतं तेवढं सोप्प नाहीये. मोठ्या भावाचं आयुष्य हे अनेक जबाबदारीने भरलेलं असतं. हीच जबाबदारी प्रतित करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे. (big brother teaches small brother how to keep calm while you are angry video goes viral)

 मोठ्या भावाचे समजाऊन सांगणं अनेकांना भावलं

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन भाऊ दिसत आहे. यापैकी एक जण सहा वर्षांचा असून हा मोठा भाऊ आहे. तर दुसरा भाऊ हा 4 वर्षांचा आहे. हे दोन्ही भाऊ अत्यंत क्यूट दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणांत व्हायरल झाला. सहा वर्षांच्या मोठ्या भावाने निभावलेले कर्तव्य अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

हा व्हिडीओ ⚘ O⚘ Y⚘ MOM या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये दोघा भावांमध्ये नेमकं काय चाललंय याबद्दल लिहण्यात आलंय. “माझा चार वर्षांचा मुलगा अतिशय खोडकर असून माझा सहा वर्षाचा मुलगा हा त्याला श्वास घेऊन शांत कसं राहायचं हे शिकवतोय,” असं कॅप्शनमध्ये लिहण्यात आलंय. या कॅप्शनसह सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर यावर वेगवेगळ्या कमेन्ट्स येणं सुरु झालं. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही.

मोठा भाऊ आपल्या लहान भावाला समजाऊन सांगतानाचा हाच तो व्हिडीओ, नक्की पाहा

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हिडीओमध्ये दोन भाऊ दिसत आहेत. यामध्ये छोटा भाऊ कोणत्यातरी गोष्टीसाठी चिडचिड करताना दिसतो आहे. तर दुसरीकडे त्याचा मोठा भाऊ हा त्याला समजावण्याच्या पवित्र्यात आहेत. तो लहान भावाला हाताने इशारा करुन रागावर, चिडचिडपणावर कसं नियंत्रण मिळवायचं हे शिकवतोय. तसेच, बोटाने इशारा करत त्याला दीर्घ श्वास कसा घ्यायचा हे सांगतोय. शेवटी दीर्घ श्वास घेऊन शांत झाल्यानंतर मोठा भाऊ आपल्या लहान भावाच्या पाठीवर थाप मारताना दिसतोय.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये मोठ्या भावाचं आपल्या लहान भावाला समजाऊन सांगणं हे लोकांना चांगलंच भावलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर त्याला अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा. तुम्हाला या व्हिडीओतून अनेक गोष्टी शिकायला मिळतील.

इतर बातम्या :

Video | पाकिस्तानी तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याकडे ‘अशी’ गोष्ट मागितली की सगळेच झाले अवाक्, पाहा नेमकी मागणी काय?

VIDEO : तरुणीची पॅराग्लायडिंग करताना याचना, खाली उतारा म्हणत अक्षरक्ष: रडली ! व्हिडीओ बघून तुम्ही प्रचंड हसाल

VIDEO | बादलीभर बिअर काही सेकंदात फस्त, पाहा हा आवाक करणारा व्हिडीओ

(big brother teaches small brother how to keep calm while you are angry video goes viral)

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.