VIDEO: पाकिस्तानमध्ये हेलिकॉप्टरमधून ‘नोटांचा पाऊस’, घरांवर चढून नोटा गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी, पाहा…

पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीन (Mandi Bahauddin) भागात हेलिकॉप्टरमधून थेट नोटांचा पाऊस (Notes Showered) पाडण्यात आलाय.

VIDEO: पाकिस्तानमध्ये हेलिकॉप्टरमधून 'नोटांचा पाऊस', घरांवर चढून नोटा गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी, पाहा...


इस्लामाबाद : एकिकडे पाकिस्तानमध्ये (Pakistan) आर्थिक दिवाळखोरीने महागाईने उच्चांक गाठलाय, तर दुसरीकडे पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीन (Mandi Bahauddin) भागात हेलिकॉप्टरमधून थेट नोटांचा पाऊस (Notes Showered) पाडण्यात आलाय. एका लग्नातील मिरवणुकीत जमा झालेल्या वऱ्हाड्यांवरून पैसे ओवाळून टाकण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पैसे आणि फूलं फेकण्यात आले. सोशल मीडियावर हा नोटा फेकण्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. नवरदेवाचा भाऊ परदेशात राहतो आणि तो भावाच्या लग्नासाठी पाकिस्तानमध्ये आला होता. त्यानेच पाहुण्यांच्या अंगावर फुलं आणि नोटांचा वर्षाव करण्यासाठी खास हेलिकॉप्टर आणल्याचं सांगितलं जातंय (Video of Notes Showered in a marriage ceremony in Pakistan).

पाकिस्तानमधील ही काही पहिली घटना नाही. याआधीही गुजरावालामध्ये एका उद्योगपतीने आपल्या मुलाच्या लग्नात पाहुण्यांवर डॉलरचा पाऊस पाडला होता. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदारपणे शेअर केला गेला होता. त्या व्हिडीओत काही लोक गाडीवर चढून मिरवणुकीत सहभागींवर नोटांची उधळण करताना दिसत आहेत.

दिवाळं निघालेल्या पाकिस्तानच्या नागरिकांकडे नोटा उधळण्याइतका पैसा कोठून येतो?

पाकिस्तानमधील अनेक लोक नोकरी किंवा व्यावसायाच्या निमित्ताने जगातील विविध देशांमध्ये राहतात. त्यामुळे मायदेशात येऊन लग्न करताना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात.

आर्थिक दिवाळं निघालेला पाकिस्तान कर्जबाजारी

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) देशातील वाढत्या महागाई आणि बेरोजगारीला रोखण्यात अपयशी ठरलेत. त्यातच वेगवेगळ्या देशांकडून कर्ज घेण्याचं प्रमाणही पाकिस्तानच्या अडचणीत वाढ करत आहे. एक अहवालानुसार सध्या पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 1 लाख 75 हजार रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. यात इमरान खान सरकारच्या कार्यकाळात 54,901 रुपयांच्या सरासरी कर्जात वाढ झालीय.

हेही वाचा :

VIDEO: कराचीत दहशतवाद्यांनी स्फोट करुन उडवली पाकिस्तानी लष्कराची गाडी

पाकिस्तानमधील वरिष्ठ सभागृहात पहिल्यादाच शिख खासदाराची एन्ट्री, कोण आहेत गुरदीप सिंह?

1000 रुपयांना आलं आणि 30 रुपयाला अंडे, महागाईने पाकिस्तानमध्ये उपासमारीची वेळ

व्हिडीओ पाहा :

Video of Notes Showered in a marriage ceremony in Pakistan

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI