Video | पाकिस्तानी तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याकडे ‘अशी’ गोष्ट मागितली की सगळेच झाले अवाक्, पाहा नेमकी मागणी काय?

तरुणीने लग्नाच्या आधी आपल्या पतीकडे अशी काही मागणी केली आहे, की ती वाचून तुम्हीसुद्धा अवाक् होऊन जाल. (pakistani girl demanded one lakh book)

Video | पाकिस्तानी तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याकडे 'अशी' गोष्ट मागितली की सगळेच झाले अवाक्, पाहा नेमकी मागणी काय?
तरुणीने होणाऱ्या पतीकडे तब्बल 1 लाख पुस्तकांची मागणी केलीये.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कधी काय होईल याचा काही नेम नाही. पाकिस्तानमधील घटनांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत आलेली आहे. पाकिस्तानमध्ये एका तरुणीने कॉलेज कँम्पसमध्ये तरुणाला केलेलं प्रपोजही चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता आणखी एका पाकिस्तानी तरुणीच्या व्हिडीओ समोर आला आहे. या तरुणीने (pakistani girl) लग्नाच्या आधी आपल्या पतीकडे अशी काही मागणी केली आहे, की ती वाचून तुम्हीसुद्धा अवाक् होऊन जाल. जाणून घेऊयात तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीकडे नेमकं काय मागितलं? (pakistani girl bridge demanded one lakh book to her groom on be half of mehar video goes viral)

मला ही कुप्रथा संपवायची आहे

पाकिस्तानच्या या तरुणीचं नाव नाईला शमल (Naila Shamal) असून ती मूळची मरदान (Mardan) येथील आहे. तिने आपल्या पतीशी अशी मागणी केली आहे, की ज्यामुळे सगळे अवाक् झाले आहेत. या मागणीसाठी तरुणीचे थेट व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपण एक लेखक असल्यामुळे मला ‘हम मेहर’ म्हणून तब्बल एक लाख पुस्तकं पाहिजेत, अशी मागणी तिने आपल्या पतीला केलीये. ही मागणी करताना, शामल या तरुणीने हक मेहर ही कुप्रथा अशून तिला संपवायचं असल्याचं म्हटलंय. “सध्या देशात महागाई वाढली आहे. मी एक लेखिका आहे. मी पुस्तकांची किंमत करणार नाही, तर मग दुसऱ्यांकडून ही अपेक्षा कशी करु शकते. त्यामुळे मला हक मेहर म्हणून तब्बल 1 लाख पुस्तकं पाहिजेत,” असं नाईला शामल या तरुणीने म्हटलंय.

पाहा तरुणीने मेहर म्हणून होणाऱ्या नवऱ्याकडे नेमकी कोणती मागणी केली


व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, तरुणीच्या मागणीचा व्हिडीओ काही क्षणांत सोशल मीडियावर व्हायरल होतोय. Mona Farooq Ahmad नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून तो शेअर करण्यात आलाय. सुरुवातीला जेव्हा हा व्हिडीओ समोर आला; तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच, तरुणीची ही मागणी विचित्र असल्याचे म्हणत सर्वांनी सुरुवातीला तोंडात बोट घातले. मात्र, हा व्हिडीओ सर्व समाजमाध्यमांवर पोहोचल्यानंतर तरुणीच्या या मागणीची सर्व स्तरांतून वाहवा होत आहे.

इतर बातम्या :

VIDEO | बादलीभर बिअर काही सेकंदात फस्त, पाहा हा आवाक करणारा व्हिडीओ

VIDEO : तरुणीची पॅराग्लायडिंग करताना याचना, खाली उतारा म्हणत अक्षरक्ष: रडली ! व्हिडीओ बघून तुम्ही प्रचंड हसाल

VIDEO | ना लग्न झालं, ना साखरपुडा, तरीही ‘गेली माझी बायको गेली’ का म्हणतायत पोरं, एकदम कडक!

(pakistani girl bridge demanded one lakh book to her groom on be half of mehar video goes viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI