AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: गुडघ्यावर फाटलेली जीन्स, पायात गमबूट, अशा महिला काय संस्कार देणार; भाजपच्या मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते, सोबत लहान मुलं आहेत, या सगळ्यातून काय संस्कार होणार | Tiarath singh Rawat

VIDEO: गुडघ्यावर फाटलेली जीन्स, पायात गमबूट, अशा महिला काय संस्कार देणार; भाजपच्या मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे
गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते
| Updated on: Mar 17, 2021 | 4:36 PM
Share

नवी दिल्ली: उत्तराखंडमधील भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tiarath singh Rawat) हे त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तीरथ सिंह रावत यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमळु ते सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. (Tiarath singh Rawat troll on social media due to controversial statment about women ripped jeans)

ते मंगळवारी देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तरुण-तरुणींना संस्काराचे महत्व पटवून देताना रावत यांची जीभ चांगलीच घसरली. मी एकदा जयपूरहून येत होतो. तेव्हा काही सहकारी माझ्यासोबत होते. दुसऱ्या दिवशी करवाचौथचा सण होता. माझे काही सहकारी दिल्लीचे होते. ते म्हणाले की, वर्षभर पत्नीला नाराज ठेवतो, मात्र करवाचौथच्या या एका दिवशी तरी त्यांचे मन राखावेच लागेल. मग मी त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्यासाठी निघालो. ज्यावेळी आम्ही विमानात बसलो तेव्हा माझ्या बाजूला एक महिला बसली होती. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा खाली गमबूट, आणखी वर बघितलं तर तिच्या गुडघ्यावरची जीन्स फाटली होती, हात बघितले तर त्यामध्ये कडेच-कडे, असा तिचा एकूण अवतार होता.

मी तिची विचारपूस केली तेव्हा तिने दिल्लीला जात असल्याचे सांगितले. मी स्वयंसेवी संस्था (NGO) चालवते असे तिने सांगितले. मात्र, गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते, सोबत लहान मुलं आहेत, या सगळ्यातून काय संस्कार होणार, असा सवाल तीरथ सिंह रावत यांनी उपस्थित केला.

‘फाटलेली जीन्स घालणं म्हणजे हल्ली स्टेटस सिम्बॉल बनलंय’

सध्याच्या काळात फाटलेली जीन्स म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजले जाते. व्यक्ती जितकी फाटलेली जीन्स घालेल तितकी ती श्रीमंत असे समजले जाते. या सगळ्यातून आपण समाजाला आणि आपल्या लहान मुलांना काय शिकवत आहोत? संस्कारांची सुरुवात ही घरातून होते. आपण जसं वागतो, त्याचंच लहान मुलं अनुकरण करतात. त्यामुळे लहान मुलांना घरातूनच चांगले संस्कार मिळाले पाहिजेत. आपण कितीही पुढारलेलो असलो तरी चांगले संस्कार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे आपण आयुष्यात कधीही अपयशी ठरणार नाही, असेही तीरथ सिंह रावत यांनी म्हटले. संबंधित बातम्या:

कारला नेमप्लेटही लावत नाही, कसे आहेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, जाणून घ्या!

तिरथ सिंह रावत : कधी आमदारकीचं तिकीट कापलं गेलेल्या अमित शाहांच्या निटकवर्तीच्याकडे राज्याची कमान

(Tiarath singh Rawat troll on social media due to controversial statment about women ripped jeans)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.