फटाके लावताना भाजपचे माजी आमदार तोंडावर पडले, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Oct 19, 2022 | 10:56 AM

फटाक्याला आग लावल्यानंतर ते घाबरून पळाले. जेव्हा ते मागे फिरले आणि पळू लागले तेव्हा ते तोंडावर पडले.

फटाके लावताना भाजपचे माजी आमदार तोंडावर पडले, व्हिडीओ व्हायरल
BJP MLA
Image Credit source: Social Media
Follow us on

दिवाळी तोंडावर आलीये! लाईट्स, दिवे, फटाके, फराळ याशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. फराळाशिवाय तर आपण भारतीय जगूच शकत नाही. फटाक्यांमुळे प्रदूषण होतं हे खरंय पण शेवटी फटाके वाजवायचे की नाही हे जो तो ठरवतो. फटाके वाजवायचं प्रमाण कमी झालं असलं तरी तितक्याच उत्साहात फटाके वाजविणारे लोक आजही आहेत. लोक आवर्जून फटाके आणतात आणि वाजवतात. पण या सगळ्या गडबडीत सगळं जग एकीकडे आणि फटाके लावताना घाबरणारे लोक एकीकडे! अरे बापरे अशा लोकांना फटाके वाजवताना कुणी बघावं. हळूच फटाके लावायला जातात, एकदम हळू! फटाका पेटवायच्या आधी तर हे टन टन उडतात आणि मग मिशन पूर्ण करतात.

असाच काहीसा प्रकार बिहारमधील एका माजी आमदाराच्या बाबतीत घडला. फटाक्याला आग लावल्यानंतर माजी आमदार घाबरून पळाले. जेव्हा ते मागे फिरले आणि पळू लागले तेव्हा ते तोंडावर पडले.

आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकतर हे माजी आमदार, त्यात फटक्याला घाबरले आणि बरं घाबरून पळता पळता तोंडावर पडले. व्हिडीओ व्हायरल होणार नाही मग काय होईल?

बिहारमधील सोनपूरचे भाजपचे माजी आमदार विनय सिंह एका फुटबॉल मॅचच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. या दरम्यान त्यांच्यासोबत ही घटना घडली.

हे प्रकरण 3 ऑक्टोबरचं आहे, पण त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हायरल क्लिपमध्ये माजी आमदार विनय सिंह उद्घाटन सामन्याआधी फटाके पेटवताना दिसतायत. व्हिडीओ मध्ये दिसून येतंय त्यांच्याभोवती आणखी काही लोक उभे आहेत, त्यातील एकाने तर भीतीपोटी कान बंद केलेत.

विनय सिंगने फटाका पेटवताच ते घाबरून मागे धावले. त्यांचा तोल बिघडतो आणि ते तोंडावर पडतात. हे पाहून आजूबाजूला उभे असलेले लोक त्यांना उचलण्यासाठी गर्दी करतात. तर दुसरीकडे फटाकेही फुटले.

विनय सिंह हे बिहार भाजपचे मजबूत नेते मानले जातात. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा पराभव करून ते पहिल्यांदाच प्रकाशझोतात आले. सध्या ते बिहार भाजपमधील शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आहेत.