शक्तिमानच्या स्पीडने डोकं चालवलं, तत्परता दाखवली आणि चोरट्यांना पकडलं! लोकं म्हणाले, “शाब्बास!”

रचना भोंडवे, Tv9 मराठी

Updated on: Oct 01, 2022 | 11:34 AM

सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे हे चोरटे पकडले गेले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

शक्तिमानच्या स्पीडने डोकं चालवलं, तत्परता दाखवली आणि चोरट्यांना पकडलं! लोकं म्हणाले, शाब्बास!
Bike Thieves viral video
Image Credit source: Social Media

दुचाकी चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना राजधानी दिल्लीतील आहे. दोन चोरटे एका अपार्टमेंटमध्ये घुसले आणि तिथे पार्क केलेली दुचाकी सुरू करून पळू लागले. परंतु गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाला ते चोर असल्याचे समजताच त्याने पटकन सोसायटीचे गेट बंद केले, त्यामुळे शेवटच्या क्षणी चोरटे गेटवर आदळले आणि खाली पडले. सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे हे चोरटे पकडले गेले.

खरं तर कुरिअर बॉयचा आवाज ऐकून सुरक्षारक्षक सावध झाला. त्याने लगेच सोसायटीचे गेट बंद केले. हे पाहून चोरांनी दुचाकीचा वेग वाढवला. पण गार्डच्या चपळाईपुढे दुचाकीचा वेगही कमी झाला.

चोरटे दुचाकीसह गेटला धडकले आणि पडले. स्थानिकांनी पोलिसांना बोलावले आणि दोन्ही चोरांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. आता ही क्लिप सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ दिल्लीतील एका सोसायटीचा असल्याचं सांगण्यात येतंय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

व्हिडिओ

दिल्ली महानगरपालिकेचे (एमसीडी) अधिकारी असल्याचे भासवून घरे तपासण्यासाठी चोरटे आले होते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

या दरम्यान सोसायटीतील एक कुरिअर बॉय एका घराची दारावरची बेल वाजवत होता. या कुरिअर बॉयने आपल्या दुचाकीला चावी तशीच ठेवली होती.

हीच दुचाकी घेऊन चोरटे पळू लागले. मात्र कुरिअर बॉयच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड सुरू केला. सुरक्षारक्षकाने तत्परता दाखवली आणि लगेच सोसायटीचं गेट बंद केलं. चोरटे त्या गेटवर आदळले.

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.चोराला असं पकडलेलं पाहिल्यावर लोकांचं हसूच थांबेना. त्या सुरक्षारक्षकाचं मात्र कौतुक सुरु आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI