AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अविश्वसनीय, जगातील सर्वात लठ्ठ व्यक्तीने तब्बल 543 किलो वजन घटवले, सौदीच्या माजी राजपूत्राने केली…

अशा प्रकारच्या सर्जरी केल्यानंतर याचे साईड इफेक्ट देखील पाहायला मिळत असतात. अनेक सेलिब्रिटींना अशा सर्जरीनंतर त्रास देखील झालेला आहे. तर काही जण आणखी 15 वर्षांनी तरुण दिसत आहेत.

अविश्वसनीय, जगातील सर्वात लठ्ठ व्यक्तीने तब्बल 543 किलो वजन घटवले, सौदीच्या माजी राजपूत्राने केली...
खालीद बिन मोहसेन शारी
| Updated on: Aug 15, 2024 | 2:15 PM
Share

जगातला सर्वात लठ्ठ हयात असलेली व्यक्ती बिन मोहसेन शारी यांनी तब्बल 543 किलो वजन घटवले आहे. बिन मोहसेन शारी याचे वजन इतके होते की तीन वर्षे झोपून होता. शारीने याला वजन घटविल्यानंतर ओळखता येणे निव्वळ अशक्य आहे. त्याला क्रेनच्या मदतीने रुग्णालयात पोहचविण्यात यायचे अशा संपूर्णपणे बेड रिडन असलेल्या शारीने अशक्य ते शक्य करुन दाखविले आहे, आता शारी केवळ 63 किलोचा झाला आहे. हा चमत्कार कसा काय झाला याने संपू्र्ण जग स्तंभित झालेले आहे.

शारीची ही अबज वेट लॉस स्टोरी सौदीचे माजी राजपूत्र किंग अब्दुल्लह यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण करणे शक्य नव्हते. सौदीच्या राजपूत्रांना वजन कमी करण्यासाठी शारीला सर्वतोपरी आर्थिक मदत केली. कारण शारीचा हा नवा अवतार पाहून जगाला धक्का बसला आहे. शारी याच्या रोजच्या एक्सरसाईज आणि औषधीय उपचारासाठी तब्बल 30 जणांचे मेडिकल पथक नेमण्यात आले होते. सौदी अरेबियातील जाझन येथून शारी याला रियाध येथील किंग फहाद मेडिकल सिटीत क्रेन आणि अनेक खटापटी करुन पोहचविणेच मोठा टास्क होता..या सर्व सोपस्कारानंतर आता शारीच्या चेहऱ्यावरील हसु उमलेले पाहून त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर देखील खुश झाले आहेत.

शारी संपूर्णपणे नॉर्मल झालाय

शारीचा हा ट्रान्सफॉर्म केवळ एक्सरसाईज किंवा डाएटमुळे शक्य झालेला नाही. त्याच्यावर यासाठी गॅस्ट्रीक बायपास सर्जरी देखील करण्यात आली आहे. स्पेशल डाएट प्लान त्याच्यासाठी आखण्यात आला होता. रुटीन व्यायाम, फिजिओथेरपी आणि मेडिकल ट्रीटमेंट अशा एकत्रित फिटनेस प्लानमुळे सहा महिन्यात बेडवर तीन वर्षे वजनामुळे झोपून असलेला शारी आता आणखीनच तरुण आणि फिट दिसू लागला आहे. त्याच्या शरीरातील अतिरिक्त चरबी काढण्यासाठी अनेक ऑपरेशन करण्यात आली आहेत. सामान्यत: अशा प्रकरणांमध्ये आम्हाला पेशंट हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी काळजी घ्यावी लागते, परंतू शारीच्या रक्तदाबात लक्षणीय घट, लिपिड प्रोफाइल चाचणीचा अहवाल अनुकूल आणि हृदयावरील ताण कमी झाल्याचे शारीच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.