AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात खड्डा खोदताना फुस्स फुस्स आवाज आला… अचानक निघाला निळ्या रंगाचा साप; तुम्ही कधी पाहिलाय असा साप?

शेतकऱ्याला शेतात काम करताना अचानक एक निळा साप दिसला. या दुर्मिळ सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांना हा साप पाहून आश्चर्य वाटले, तर काही जण याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सर्पमित्रांच्या मते, हे साप कमी आढळतात आणि त्यांना न मारता वन विभागाला कळवावे. व्हिडिओ खरा की एआय, यावर चर्चा सुरु आहे.

शेतात खड्डा खोदताना फुस्स फुस्स आवाज आला... अचानक निघाला निळ्या रंगाचा साप; तुम्ही कधी पाहिलाय असा साप?
निळा कोब्रा कधी पाहिला आहे का ?Image Credit source: Image Credit source: Instagram/@bhagvanbhai_mahadeviya
| Updated on: Oct 21, 2025 | 1:48 PM
Share

जगात विविध प्रकारच्या वन्यजाती प्रजाती आहेत. काही लोकांना माहीत आहेत. तर काही लोकांना माहीत नाहीत. साप हा त्यापैकीच एक प्राणी. तसा तो शेतकऱ्यांचा मित्र. शेतात तुम्हाला साप हमखास दिसतीलच दिसतील. मोकळ्या रानात हा जीव नेहमी दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची नेहमीच सापांशी गाठ पडते. काही शेतकरी त्यांना जीवे मारतात. तर काही शेतकरी त्यांना सोडून देतात. साधारणपणे शेत, जंगल आणि गवताच्या मैदानात तसेच झाडाझुडूपांमध्ये साप आढळतात. बरेच लोक साप पाहून बिथरतात. घाबरून चिंगाट पळतात. तर काही लोक सापाला लिलया पकडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सापाचाच हा व्हिडीओ आहे. पण हा साधासुधा साप नाहीये. मात्र, या व्हायरल व्हिडीओत किती तथ्य आहे, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.

या व्हायरल व्हिडीओत एक शेतकरी त्याच्या शेतात काम करताना दिसत आहे. शेतात खड्डा खोदताना आधी फुस्स आवाज येतो. त्यामुळे शेतकरी दचकून मागे होतो. तेव्हा अचानक एक भला मोठा नाग बाहेर येतो. तो फणा काढून फुस्स करू लागतो. शेतकरी त्याला फावड्याच्या मदतीने हटवताना दिसत आहे. हा साप पाहून सर्वच हादरले. शेतकऱ्याने सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला. पण साप काही जागचा हल्ला नाही. त्यामुळे काही लोकांनी त्याचा सेल्फी काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा साप हळूहळू झाडाच्या दिशेने गेला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निळ्या रंगाचा साप पाहून सर्वच थक्क झाले. काहींची तर घाबरगुंडी उडली.

तेव्हा साप बाहेर येतो

साप पकडणाऱ्या सर्प मित्राच्या मते अशा प्रकारचे निळे साप फार कमी दिसतात. पावसाळा संपल्यावर किंवा वातावरण बदलल्यानंतर हे साप बाहेर येतात. शेतकरी आणि ग्रामस्थांना सल्ला राहील की त्यांनी या सापांपासून दूर राहिलं पाहिजे. या सापांना मारू नये. तुम्हाला असा साप आढळला तर थेट वन विभागाला कळवा. म्हणजे ते त्याला त्याच्या अधिवासात सोडतील, असं या सर्प मित्राचं म्हणणं आहे.

आश्चर्य आणि शंका

निळ्या रंगाच्या सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. नेटिजन्स तर या सापाचा रंग पाहून थक्क झालेत. अशा प्रकारचा सुंदर साप खरोखरच असतो का? असे सवाल नेटिजन्सकडून केले जात आहेत. हा खरोखरचा साप आहे की एआयची कमाल आहे? अशी शंकाही नेटिजन्स घेत आहे. तर काहींच्या मते सापाचा रंग फिल्टरच्या मदतीने बदलला गेला आहे. आता काय खरं काय खोटं हे तज्ज्ञच सांगतील. पण निळ्या रंगाच्या सापाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आश्चर्य आणि शंका दोन्ही व्यक्त केल्या जात आहेत.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?