Video | पिळदार देह, बलदंड भुजा, सोशल मीडियावर अनोख्या कांगारूची चर्चा, व्हिडीओ पाहाच

या व्हिडीओमध्ये पिळदार देह तसेच बलदंड भुजा असलेला एक कांगारू दिसत आहे. या कांगारुची आकर्षक देहयष्टी पाहून लोक अवाक् झाले आहेत. ( bodybuilder kangaroo viral video)

Video | पिळदार देह, बलदंड भुजा, सोशल मीडियावर अनोख्या कांगारूची चर्चा, व्हिडीओ पाहाच
KANGAROO VIRAL VIDEO
| Updated on: May 31, 2021 | 4:43 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे प्राणी तसेच पक्ष्यांचे असतात. प्राण्यांचे विविध व्हिडीओ पाहायला लोकांना आवडते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पिळदार देह तसेच बलदंड भुजा असलेला एक कांगारू दिसत आहे. या कांगारुची (Kangaroo) आकर्षक देहयष्टी पाहून लोक अवाक् झाले आहेत. (bodybuilder Kangaroo video goes viral on social video people comparing with Vin Diesel)

कांगारुची पिळदार देहयष्टी

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कांगारू दिसतोय. या कांगारुच्या भुजा अगदीच पिळदार दिसत आहेत. कांगारुचे आकर्षक शरीर पाहून त्याची तुलना हॉलीवुड अभिनेता Vin Diesel सोबत केली जात आहे.

अनेकांना कांगारुची भुरळ

सामान्यत: प्राणी पाहून अनेकजण घाबरतात. समोर उभ्या असलेल्या प्राण्यांपासून आपल्याला काही धोका तर नाही ना ? असा विचार प्रत्येकजण करतो. याच कारणामुळे लोक प्राण्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कधी कधी आपल्या समोर असे काही प्राणी येतात, ज्यांना पाहून आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. या कांगारुच्या बाबतीतही असेच झाले आहे. त्याच्या पिळदार देहयष्टीची अनेकांना भुरळ पडली आहे.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चीला जातोय. या कांगारुला पाहून त्याची वाहवा केली जात आहे. या व्हिडीओला tyrese इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेय. त्याला आतापर्यंत 2 लाख 63 पेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. भरदार कांगारुला पाहून अनेकजण मजेदार कमेट्ससुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Viral Video : भर रात्री रस्त्यावर विचित्र आकृती, लोक म्हणतायत हा तर एलियन, व्हिडीओ व्हायरल

Video : लाडाच्या चिमणीचा रुबाबच न्यारा, स्केटिंगचा हा व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video | छोट्याशा मुलीने शेवटी करुन दाखवलं, जिद्दीला सलाम ठोकत थेट आयएएस अधिकाऱ्याने मानलं गुरु

(bodybuilder Kangaroo video goes viral on social video people comparing with Vin Diesel)