Video | कॅरम खेळताना मध्येच फिसकटलं, दोन म्हाताऱ्यांमध्ये जोरदार राडा, व्हिडीओ व्हायरल

म्हाताऱ्या माणसांच्या अल्लडपणाचा एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्हालाही हसू फुटेल. (old men fight while playing carrom)

Video | कॅरम खेळताना मध्येच फिसकटलं, दोन म्हाताऱ्यांमध्ये जोरदार राडा, व्हिडीओ व्हायरल
old aged men playing carrom

मुंबई : असं म्हणतात की म्हातारी माणसं ही समजदार असतात. अल्लड आणि पोरकट मुलांना समज देण्याचं तसेच चांगल्या आणि वाईट गोष्टी समजाऊन सांगण्याचे काम ही म्हातारी माणसे मोठ्या खुबीने करतात. म्हाताऱ्या लोकांना पाहून आपल्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण होतो. मात्र, सध्या याच म्हाताऱ्या माणसांच्या अल्लडपणाचा एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्हालाही हसू फुटेल. या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध माणसे जोरदार भांडण करत आहेत. त्यांच्या या भांडणामुळेच सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Two old men fight while playing Carrom funny video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध कॅरम खेळताना दिसत आहेत. यामध्ये एक म्हातारा काळ्या रंगाचा शर्ट घालून मांडी घालून बसलाय. तर दुसरा म्हातारा माणूस पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून खाली बसल्याचं दिसतंय. हे दोन्ही वृद्ध कॅरम खेळतायत. यावेळी अचानकपणे त्यातील एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला कॅरम खेळण्यापासून रोखतोय.

त्यानंतर कॅरम खेळायला देत नसल्यामुळे दुसऱ्या म्हाताऱ्याला लगेच राग अनावर झालाय. याच म्हाताऱ्याने दुसऱ्याच क्षणात समोरील कॅरम बोर्डवरील कॅरम पिसेस (Carrom Pieces) उधळून लावले आहेत. या प्रकारानंतर मात्र, पहिला म्हातारा चांगलाच भडकला आहे. या भडकलेल्या म्हाताऱ्याने खाली बसलेल्या म्हाताऱ्याला चक्क मारायला सुरुवात केलीये. काळ्या शर्टमधील म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याच्या पाठीमध्ये जोरजोरात मारतो आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा मजेदार व्हिडीओ पाहून नेटवर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ ‘@shrikrishanmtr’ या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. व्हिडीओ शेअर करताना “दिल तो बच्चा है, लहानपणा कधीही जिंवत राहायला हवं’ असे मजेदार कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलेच पाहिजे जात असून लोक त्याला पसंद करत आहेत.

इतर बातम्या :

Video | आई-वडिलांनी दिलं ‘असं’ गिफ्ट की मुलगी झाली अवाक्, व्हिडीओ एकदा पाहाच

लॉकडाऊन सुरु असताना बंगल्यात डान्स पार्टाचं आयोजन, पुण्यात 13 तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल

Health Benefits of Sesame : दररोजच्या आहारात तिळाचा समावेश करा ‘हे’ फायदे होतील !

(Two old men fight while playing Carrom funny video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI