Video | आई-वडिलांनी दिलं ‘असं’ गिफ्ट की मुलगी झाली अवाक्, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | आई-वडिलांनी दिलं 'असं' गिफ्ट की मुलगी झाली अवाक्, व्हिडीओ एकदा पाहाच
birthday girl gift

सध्या असाच एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलीला झालेला आनंद पाहून नेटकरी चांगलेच फुलले आहेत. (girl gets puppy surprise gift)

prajwal dhage

|

May 30, 2021 | 3:58 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे प्राणी तसेच पक्ष्यांचे तर काही व्हिडीओ हे लहान मुलांचे असतात. यातील बरेच व्हिडीओ सोशल मीडियीवर लगेच व्हायरल होतात. सध्या असाच एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलीला झालेला आनंद पाहून नेटकरी चांगलेच फुलले आहेत. (girl gets Puppy as surprise gift by his father her reaction goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

आपल्या मुलांचा वाढदिवस आनंदात आणि मजेत साजरा केला जावा म्हणून अनेक आईवडील मोठी मेहनत घेतात. अनेक पालक आपल्या पाल्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देतात. व्हिडीओतील आईवडिलांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाची भेट म्हणून एक खास गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट पाहून मुलीच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आपल्या वडिलांनी दिलेलं सरप्राईज गिफ्ट मुलीला चांगलेच आवडल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय.

कुत्र्याचे गोड पिल्लू पाहून मुलीला आनंद

आपल्या वाढदिवशी कुणी सरप्राईज गिफ्ट दिलं तर त्या वेळी होणारा आनंद हा वेगळाच असतो. असंच काहीसं व्हिडीओतील मुलीच्या बाबतीत झालं आहे. तिच्या वडिलांनी तिला सरप्राईज गिफ्ट म्हणून कुत्र्याचे एक गोड पिल्लू दिलं आहे. हे पिल्लू पाहताच मुलीला अपार आनंद झाला आहे. लहान मुलांना कुत्रे, मांजर असे प्राणी पाळायाला खूप आवडतात. याच कारणामुळे व्हिडीओतील मुलीला तिच्या आई-वडिलांनी तिला एक छान आणि गोड कुत्र्याचे पिल्लू भेट म्हणून दिले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, कुत्र्याचे पिल्लू पाहून व्हिडीओतील मुलीला झालेला आनंद पाहण्यासारखा आहे. समोर कुत्रा दिसताच मुलीने त्याला प्रेमाने उचलून घेतले आहे. प्रेमाणे ती ओरडत आहे. तसेच व्हिडीओतील मुलगी त्या कुत्र्यावर प्रेमाने हात फिरवत असल्याचेसुद्धा दिसतेय. कुत्रा समोर दिसताच व्हिडीओतील मुलीचे हावभाव पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओला शेअर करुन मजेदार कमेंट्स केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

खान सरांच्या नावाचं कोड सुटलं, सहकाऱ्यानंचं गुपित फोडलं, नेमकं प्रकरण काय?

Viral Video | गाफिल कुत्रा, तरबेज मगर, एका सेकंदात जबड्यात पकडलं; शिकारीचा थरारक व्हिडीओ एकदा पाहाच

Video | जिगरबाज कुत्र्याचा मृत्यूशी खेळ, पठ्ठ्याची डॉनगिरी सोशल मीडियावर व्हायरल

(girl gets Puppy as surprise gift by his father her reaction goes viral on social media)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें