AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खान सरांच्या नावाचं कोड सुटलं, सहकाऱ्यानंचं गुपित फोडलं, नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या खान सरांच्या नावाचं कोड सुटलं आहे. Khan Sir real Name

खान सरांच्या नावाचं कोड सुटलं, सहकाऱ्यानंचं गुपित फोडलं, नेमकं प्रकरण काय?
खान सर
| Updated on: May 30, 2021 | 12:47 PM
Share

नवी दिल्ली: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘खान सर’ चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओतील एका वक्तव्यामुळे वाद पेटलेला आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्याबद्दल उलट सुलट चर्चा करायला सुरुवात केली. हे ‘खान सर’ नेमके कोण आहेत? अशा चर्चा सुरु झाल्या. काही जणांनी ते खान सर नसून ते अमित सिंह आहेत, असा दावा केला. त्यासाठी त्यांच्या एका व्हिडीओचा दाखला दिला जात होता. काही जण त्यांचं मूळ नाव फैजल खान असल्याचा दावा करत होते. सोशल मीडियावर खान सरांची चर्चा सुरु होती. खान जी एस रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यासोबत अध्यापनाचं काम करणाऱ्या सहकाऱ्यानं त्यांच्या नावाचं गुपित उघडं केलं आहे. (Khan Sir controversy on social media his colleague told real name)

खान सर नेमके कोण?

बिहारची राजधानी पाटणा शहरामध्ये खान सर यांची ‘खान जी एस रिसर्च सेंटर’ ही संस्था आहे. खान सर त्यांच्या अनोख्या शैलीत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात. यामुळे ते सातत्याने चर्चेत असतात. नुकत्याच झालेल्या एका वादानंतर त्यांच नाव जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावरील नेटकऱ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. पाटणामधील खान सर यांच्या मित्रानं त्यांच्या नावाविषयीचं गुपित उघड केलं आहे. महेंद्र सागर यांनी खान सर यांचं नाव फैजल खान असल्याचं सांगितलं आहे. महेंद्र सागर यांनी पाटणामध्ये जिथं क्लास सुरु आहे तेथील जागा मालकाकडे याची माहिती उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे.

यूट्यूबवर 92 लाख फॉलोअर्स

खान सर यांनी एका व्हिडिओमध्ये लोक त्यांना खान सर या नावानेच ओळखतात असं देखील सांगितले आहे. ते इतिहास, भूगोल, हिंदी, केमिस्ट्री, फिजिक्स या विषयातील एखाद्या मुद्द्यावर, प्रश्नावर लगेचच त्यांच्या शैलीमध्ये उत्तर देतात. सोशल मीडियावर खान सर यांच्या यूट्यूब चॅनेलला 92 लाख लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे. खान सर गेल्या काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावरील वातावरण तापलेलं आहे.

मुस्लीम असण्यावर प्रश्नचिन्ह

टिपू सुलतान पार्टीने खान सर यांचा फोटो शेअर करत ते मुस्लिम आहेत का नाहीत हे आम्हाला माहीत नाही, असं म्हटलं आहे. या ट्विटवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सलीम शेख नाव असणाऱ्या व्यक्तीने खान सर मुस्लीम असू शकत नाहीत असा दावा केला. तर, काही लोकांनी त्यांना संघी देखील म्हटलं आहे.

खान सर चर्चेत का?

24 एप्रिल रोजी खान सर यांनी सोशल मीडियावर फ्रान्स आणि पाकिस्तान यांच्या संबंधात विषयी एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी पाकिस्तानमधील आंदोलन करणाऱ्या मुलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतंय, त्यांनी यामध्ये एक कॉमेंट केली होती ती म्हणजे मुलांनो शिक्षण घ्या नाहीतर पंक्चर काढायला लागेल. नाहीतर चौकांमध्ये मटन कापावे लागेल, याशिवाय पुढे खान सर यांनी 18 ते 19 मुलं जन्माला आली तर काय कामाची असं देखील म्हटलं होतं.हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यानंतर खान सर यांच्यावर टीका सुरू झाली.

या व्हिडीओपासून वाद सुरु झाला

संबंधित बातम्या:

खान सर नेमके कोण? फैजल खान की अमित सिंह, सोशल मीडियावर ‘ते’ चर्चेत का?

Video | तहानलेला गरुड तृप्त, वाटसरुने रस्त्यावरच पाजले पाणी, व्हिडीओ व्हायरल

(Khan Sir controversy on social media his colleague told real name)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.