Video | तहानलेला गरुड तृप्त, वाटसरुने रस्त्यावरच पाजले पाणी, व्हिडीओ व्हायरल

गरुडाला पाणी पाजणाऱ्या एका माणसाचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंदीस उतरला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (eagle drink water video goes viral)

  • Updated On - 12:54 am, Wed, 26 May 21
Video | तहानलेला गरुड तृप्त, वाटसरुने रस्त्यावरच पाजले पाणी, व्हिडीओ व्हायरल
eagle bird

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. मात्र, यातील काही मोजक्याच व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून पसंदी मिळते. सध्या गरुडाला पाणी पाजणाऱ्या एका माणसाचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंदीस उतरला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (boy helping eagle to drink water video goes viral)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी व्हिडीओतील माणसाचे तोंडभरुन कौतूक केले आहे. व्हिडीओमध्ये एक गरुड आणि एकूण तीन माणसे दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे रस्त्याच्या बाजूला एक गरुड उभा आहे. या गरुडाला तहान लागली आहे. ही गोष्ट लक्षात येताच व्हिडीओतील एका माणसाने तहानलेल्या गरुडाला पाणी पाजले आहे. त्याच्याजवळ असलेल्या बॉटलच्या मदतीने तहानलेल्या गरुडाला त्याने पाणी दिलेय. त्या माणसाच्या समोर उभे असलेले त्याचे मित्र हा क्षण कॅमेऱ्यात कैद करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा शानदार व्हिडीओ Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. प्राणी तसेच पक्षांवर प्रेम तरणाऱ्या लोकांनी तर गरुडाला पाणी पाजणाऱ्या माणसाचे विशेष कौतूक केले आहे.

इतर बातम्या :

Video | अहमदनगरमध्ये टोळीयुद्ध, तुफान राड्यात 8 जण गंभीर जखमी, गाड्यांचीही तोडफोड

Video : भेदक नजर, विजेसारखा वेग, मांजरीने केलेली ‘ही’ शिकार एकदा पाहाच

Video | गाढव-मुलीचं अतूट नातं, हंबरडा पाहून नेटकरी भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(boy helping eagle to drink water video goes viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI