Viral Video | गाफिल कुत्रा, तरबेज मगर, एका सेकंदात जबड्यात पकडलं; शिकारीचा थरारक व्हिडीओ एकदा पाहाच

व्हिडीओमध्ये मगरीने एका कुत्र्याची मोठ्या शिताफीने शिकार केली आहे. शिकारीचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. (crocodile attacks dog video goes viral)

Viral Video | गाफिल कुत्रा, तरबेज मगर, एका सेकंदात जबड्यात पकडलं; शिकारीचा थरारक व्हिडीओ एकदा पाहाच
CROCODILE CATCHES DOG VIDEO


मुंबई : सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हडिओ एका क्षणात व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओमध्ये मगरीने एका कुत्र्याची मोठ्या शिताफीने शिकार केली आहे. शिकारीचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. (Crocodile attack and catches Dog video goes viral on social media)

कुत्र्याला गाफिलपणा भोवला

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नदीच्या किनारी एक कुत्रा भटताना दिसतोय. नदीच्या किनाऱ्यावर कोणीही नसल्यामुळे हा कुत्रा अगदीच निवांत दिसतोय. अन्नाच्या शोधात असलेला हा कुत्रा चांगलाच आत्ममग्न झालाय. मात्र, याच वेळी कुत्र्याची शिकार करणारी एक मगर त्याच्याकडे येत आहे. या कुत्र्याला गिळंकृत करण्यासाठी मगरीने चांगला डाव आखल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. कसलाही आवाज न करता अगदी संथपणे ही मगर कुत्र्याची शिकार करतेय.

पाहा व्हिडीओ :

एका क्षणात कुत्र्याला जबड्यात पकडलं

व्हिडीओमध्ये कुत्रा नदीकिनाऱ्यावर मजेत भटकतोय. मात्र, यावेळी नदीच्या पाण्यातून मगर संथपणे त्याची शिकार करायला येत आहे. तिच्या संथपणाला तसेच शिकारीसाठीच्या तिच्या एकाग्रतेला तोड नसल्याचे या व्हिडीओतून दिसतेय. यावेळी व्हिडीओमध्ये शेवटी अन्न न मिळाल्यामुळे कुत्रा तेथून निघून जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसतेय. मात्र, याच वेळी कुत्रा निघून जाण्याच्या बेतात असल्यामुळे डाव साधण्यासाठी मगर कुत्र्याच्या चांगलीच जवळ जाताना दिसतेय. त्यानंतर एका क्षणात मगरीने कुत्र्यावर झडप घेऊन आपल्या कणखर जबड्यात त्याला धरल्याचं दिसतंय. एका सेकंदात मगरीने कुत्र्याला गिळंकृत केल्याचं आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील रावतभाटा येथील असल्याचे सांगितले जातेय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | जिगरबाज कुत्र्याचा मृत्यूशी खेळ, पठ्ठ्याची डॉनगिरी सोशल मीडियावर व्हायरल

Video | “काहीही झालं तरी लस घेणार नाही”, आजीबाई चांगल्याच भडकल्या, मजेदार व्हिडीओ पाहाच

Video | मुलाने होकार देताच लग्नाळू नवरी फुलली, होणाऱ्या नवऱ्याला थेट किस करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

(Crocodile attack and catches Dog video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI