Video | जिगरबाज कुत्र्याचा मृत्यूशी खेळ, पठ्ठ्याची डॉनगिरी सोशल मीडियावर व्हायरल

सध्या एका कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियीवर चांगलाच चर्चीला जातोय. या व्हिडीओला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. (viral video dog stand on electricity wire)

Video | जिगरबाज कुत्र्याचा मृत्यूशी खेळ, पठ्ठ्याची डॉनगिरी सोशल मीडियावर व्हायरल
dog on electricity wire
prajwal dhage

|

May 29, 2021 | 7:09 PM

मुंबई : सोशल मीडियाचं विश्व मोठं व्यापक आहे. या मंचावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओंमध्ये प्राण्यांच्या वेगवेगळ्या कसरती तसेच त्यांचे थक्क करुन सोडणारे कसब दाखवलेले असतात. प्राण्यांच्या तसेच पक्षांच्या व्हिडीओंमुळे सोशल मीडियावरील वातावरण नेहमीच गरम असते. सध्या एका कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियीवर चांगलाच चर्चीला जातोय. या व्हिडीओला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण व्हिडीओतील कुत्र्याने जे केलं आहे, ते सामान्य प्राण्यांनी करणं जवळपास अशक्यच आहे. (video of Dog stand on electricity wire goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कुत्रा दिसत आहे. या व्हिडीओमधील कुत्रा काही जमिनीवर उभा नाहीये. तर तो थेट विजेच्या तारांवर उभा आहे. म्हणजेच तो हवेत तरंगतो आहे. दोन विजेच्या तारांवर तो मोठ्या दिमाखात उभा असल्याचे दिसतेय.

विजेच्या तारेवर कुत्रा दिमाखात उभा

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तोंडात बोट घातले आहे. कारण कुत्रा ज्या विजेच्या तारेवर उभा असलेला दिसतोय, त्या काही साध्या तार नाहीयेत. त्यांचा उपयोग मानवी वस्तीत वीज वाहून नेण्यासाठी केला जातोय. त्यामुळे कुत्रा तारांवर उभा असूनही त्याला विजेचा धक्का लागत नाहीये. तो अगदीच दिमाखात उभा असल्याचे दिसतेय. कुत्र्याची हीच ऐट आणि रुबाबदारपणा पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या मजेदार कमेंट्स

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. व्हिडीओतील कुत्र्याच्या धाडसाची सर्वांनी वाहवा केलीये. अनेकांनी या व्हिडीओला सोशल मीडियावर शेअर केले असून त्यावर नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘Fred Schultz’ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय.

इतर बातम्या :

Video | “काहीही झालं तरी लस घेणार नाही”, आजीबाई चांगल्याच भडकल्या, मजेदार व्हिडीओ पाहाच

VIDEO | हत्तीला पाहून वाघाने ठोकली धूम; लोक म्हणाले, कळले ना जंगलचा राजा कोण!

Video | मुलाने होकार देताच लग्नाळू नवरी फुलली, होणाऱ्या नवऱ्याला थेट किस करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

(video of Dog stand on electricity wire goes viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें