VIDEO | हत्तीला पाहून वाघाने ठोकली धूम; लोक म्हणाले, कळले ना जंगलचा राजा कोण!

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: May 28, 2021 | 7:13 PM

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही हत्तीचा दरारा काय असतो, याची कल्पना येऊ शकते. (Seeing the elephant, the tiger ran away; People said, I don't know who is the king of the forest)

VIDEO | हत्तीला पाहून वाघाने ठोकली धूम; लोक म्हणाले, कळले ना जंगलचा राजा कोण!
हत्तीला पाहून वाघाने ठोकली धूम

नवी दिल्ली : जंगलात वाघाचा रुबाब, दरारा काही वेगळाच असतो. इतर प्राण्यांमध्ये त्याची प्रचंड दहशत आहे. त्यामुळेच बहुतेक प्राणी वाघाच्या जवळपास अजिबात फिरकत नाहीत. वाघाची नुसती चाहूल लागली की जिथे असेल, तेथून काढता पाय घेण्याची प्राण्यांची धावपळ सुरू असते. पण सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हे बघून हे कळेल की वाघ कितीही आक्रमक प्राणी असला तरी हत्तीपुढे त्याचीही हवा फुस्स होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही हत्तीचा दरारा काय असतो, याची कल्पना येऊ शकते. (Seeing the elephant, the tiger ran away; People said, I don’t know who is the king of the forest)

अभिनेत्री दिया मिर्झाने शेअर केला व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिझार्नेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीयाने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की या व्हिडिओच्या शेवटी काय होते ते पहा, मी हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हे दिसू शकते की एक वाघ मोठ्या आनंदात जंगलात बसला आहे, परंतु नंतर हत्तीही त्याच मार्गाने येतो. हत्तीला आपल्याकडे येत असल्याचे पाहून वाघ पटकन पळून गेला.

व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल

आता हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. व्हिडीओ पाहणारे लोक यावर आपल्या कमेंट्सही नोंदवत आहेत. अनेक जण आपल्या प्रोफाईलवरून शेअर करीत असून त्यांच्या पोस्टवर लाईक्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. एका युजरने म्हटले आहे की, वाघ हा जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी असला तरी हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यासमोर तो आपली हिंमत ढुस्स होते. त्याचवेळी दुसऱ्या एका युजरने लिहिले की जंगलातील प्रत्येक प्राण्याला समजून चुकले आहे की हत्तीपासून पंगा घेणे महागात पडू शकते. म्हणूनच हत्तीपासून दूर राहणेच योग्य आहे.

आतापर्यंत 15 हजार लोकांनी पाहिला व्हिडिओ

दियाच्या ट्वीटचा संदर्भ देताना आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी लिहिले की, ‘मी नेहमीच म्हणतो म्हणून हत्ती हाच जंगलाचा खरा राजा आहे. त्याच्याविरोधात उभे राहणे कोणालाही परवडणारे नाही. दीया मिर्झा यांच्या ट्विटवरील व्हिडीओ बातमी लिहिपर्यंत तब्बल 15 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच जवळपास एक हजार लोकांनी लाईक्स दिल्या आहेत. यावरून हा व्हिडीओ सोशल मीडियात किती लोकप्रिय झाला आहे याची तुम्हाला प्रचिती येऊ शकतो. तुम्हीही हा व्हिडीओ पाहताना नक्की आनंदून जाल. इतकेच नव्हे तर हत्तीपुढे जंगलाचा राजा कसा धूम ठोकतो, याचा आनंद लुटण्यासाठी इतरांनाही हा व्हिडीओ शेअर कराल, यात शंका नाही. (Seeing the elephant, the tiger ran away; People said, I don’t know who is the king of the forest)

इतर बातम्या

आरोपीला मारहाण करणं अंगाशी, पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, सीआयडीने तपास नेमका कसा केला?

भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगाव बाजार समितीत दगडफेक, शेतकरी आक्रमक

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI