बॉसचे अजब फर्मान, आजारी होण्याआधी…,’ भडकली महिला कर्मचारी, Viral Video
देबलिना नावाच्या एका कर्मचाऱ्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून आपली व्यथा व्यक्त केली आहे.आजारपणासाठी दोन दिवसांच्या रजेवर ती केली. पण जेव्हा ती ऑफिसला परतली, तेव्हा तिच्या बॉसने एक नवा नियम सांगितला, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला..

Viral Video: कॉर्पोरेट लाईफमध्ये कर्मचाऱ्यांसाठी अजबगजब निर्णय होणे ही काही नवीन गोष्ट नाही.परंतू सोशल मीडियावर अलिकडे एक असा मामला व्हायरल झाला आहे की तो पाहून तुम्ही म्हणाल हद्दच झाली ! हा मामला असा आहे की एक महिला कर्मचारी दोन दिवस रजेवर गेली तर तिच्या बॉसने नवा रुल तयार केला. बॉसने फर्मान काढले की जर सिक लिव्ह घ्यायची असेल तर याची माहिती आदल्या रात्रीच द्यावी ! आता इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहून सर्व जण हैराण झाले आहेत की कोणी अंतर्यामी आहे का, ज्याला आधीच कळेल की उद्या तो आजारी पडणार आहे.
देबलिना नावाच्या एका नोकरदार महिलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करीत आपले दु:ख सांगितले आहे. तिने सांगितले की तब्येत बरी नसल्याने ती दोन दिवस सिक लिव्हवर होती. परंतू नंतर बरी होऊन ते कामावर परतली. तर तिला मॅनेजरने नवे फर्मान काढल्याचे कळाले. बॉसचे म्हणणे होते की जर कोणाला आजारपणाची सुट्टी हवी असेल तर त्याची सूचना त्याने आदल्या रात्रीच द्यावी. म्हणजे उद्या जर तुम्हाला ताप येणार असेल तर, बॉसला आज रात्री सांगावे…
बॉसच्या या अजब मागणीवर देबलिना मजेदार ढंगात व्यक्त झाली आहे. तिने व्हिडीओत हसत सांगितले की जर मला आधीच कळले की उद्या मी आजारी पडणार आहे, माझी तब्येत खराब होणार आहे. तर ही सुपरपॉवर झाली. मला ताप येण्याआधी नोटिफिकेशन येणार का… आजच सिक लिव्हचा अर्ज करा. ती मजेत म्हणाली की जर मी एवढी अंतर्यामी असते, तर या कंपनीत नोकरी करण्याऐवजी IPL मॅचची भविष्यवाणी करुन कोट्यवधी रुपये कमावले असते..ना !
येथे व्हिडीओ पाहा –
या व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आणि कॉर्पोरेट जगतातील त्रस्त कर्मचारी कमेंट सेक्शनमध्ये तुटून पडले. एकाने लिहिले की कॉर्पोरेटमध्ये लॉजिक सोडून बाकी सर्व चालतं.दुसऱ्या एका ने म्हटले की भाई माझावाला तर टॅबलेट घेऊन कामावर येण्यास सांगतो. एका अन्य युजरने कमेंट केली की कोणतीही कंपनी खराब नसते, बस काही अशा बॉसमुळे बदनाम होते.