VIDEO: मुलाची मस्करी, तरुणी भिजली, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

Viral Video | सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत.

VIDEO: मुलाची मस्करी, तरुणी भिजली, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 10:59 AM

मुंबई: सोशल मीडियावर दररोज खोऱ्याने मजेशीर व्हीडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हीडिओ अक्षरश: पोट धरून हसायला लावतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक गमतीशीर प्रँकचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एका मुलाने मुलीसोबत प्रँक केले आहे. या व्हीडिओत मुलगा एका मोठ्या वाडग्यात पाणी भरताना दिसत आहे. त्यानंतर मुलाने वाडग्याच्या खालच्या बाजूला चिकटपट्टी लावली आणि तो किचनच्या ओट्यावर ठेवला. चिकटपट्टीमुळे पाण्याचा वाडगा ओट्याला चिकटला गेला.

त्याचवेळी त्याची मैत्रीण त्याठिकाणी आल्याचे व्हीडिओत दिसत आहे. या मुलीने ओट्यावरील वाडगा उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाडगा बाजूने चिकटल्यामुळे वाडगा सहजपणे उचलला जात नाही. त्यामुळे वैतागून मुलीने वाडगा पूर्ण जोर लावून उचलला. मात्र, त्यामुळे वाडग्यातील सर्व पाणी मुलीच्या अंगावर सांडते. हे पाहून मुलगा जोरजोरात हसताना दिसत आहे. या प्रकारामुळे मुलगी काहीशी चिडते आणि मुलाच्याही अंगावर पाणी ओतते.

सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.

संबंधित बातम्या:

Video : स्टेजवर दोन मुलींची अशी झाली नाचक्की, हा व्हिडीओ पाहून मुली म्हणणारच नाहीत, ‘डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो’

Video | वहिनीचा स्लीव्हलेस ब्लाऊज, पिवळ्या रंगाची साडी, दिरासोबतच्या डान्सने आग लावली, व्हिडीओ पाहाच !

VIDEO: तोल गेला अन् गाढव टेकडीवरून घसरलं, दगडांवरुन ठेचकाळत खाली आलं, पण क्षणात उभं राहून चालायला लागलं