Business Idea: तिलक लावा आणि पैसे कमवा; महिन्याला नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवाल; Video Viral

अनेकांना व्यवसाय सुरु करायचा असतो पण तो कसा सुरु करायचा हे मात्र सनजत नाही. आता बिजनेस सुरु करायचा असेल तर एका प्रसिद्ध उद्योगपतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Business Idea: तिलक लावा आणि पैसे कमवा; महिन्याला नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवाल; Video Viral
| Updated on: Jun 29, 2026 | 2:53 PM

कॉर्पोरेट जगताची सध्याची स्थिती पाहता, प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो की मी माझा व्यवसाय सुरू करायला हवा. कॉर्पोरेट लाइफशी जुळवून घेणे सोपे नसते, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो तो म्हणजे व्यवसाय सुरू करणे. पण ते तितके सोपे नाही. योग्य नियोजनाशिवाय, एखादा व्यवसाय सुरू होण्याआधीच कोसळू शकतो. अनेकांना तर कोणता व्यवसाय सुरु करु इथून सुरुवात असते. काही केल्या कल्पना सुचत नाही. साधा, सोपा व्यवसाय सुरु करायचा असतो पण तो कोणता हे नेमकं कळत नाही त्यामुळे लोक संभ्रमात असतात आणि शेवटी व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न हे अपुरे राहते. आता यांच्यासाठी एका प्रसिद्ध उद्योगपतीने एक कल्पना सुचवली आहे.

जर तुम्ही पैसे कमवण्याचा नवीन मार्ग शोधत असाल, तर प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी तो मार्ग उघड केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक तरुण एका धार्मिक स्थळी भाविकांना तिलक लावताना दिसत आहे. या तरुणाचा दावा आहे की, यातून महिन्याला 70,000 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.

हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ऋषिकेशमध्ये भाविकांना तिलक लावून किती पैसे कमावता येतात, हे तो तरुण समजावून सांगत आहे. हे जाणून घेण्यासाठी, तो पारंपरिक कपडे घालून भाविकांना तिलक लावण्यासाठी बाहेर पडतो. दिवसा तो फारसे पैसे कमवत नसला तरी, संध्याकाळच्या आरतीनंतर चित्र पूर्णपणे बदलते. हर्ष गोएंका यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, तो तरुण सांगतो की तो पारंपरिक कपडे घालून ऋषिकेशच्या रस्त्यांवर भाविकांना तिलक लावण्यासाठी बाहेर पडतो. सुरुवातीला, लोक तिलक लावून घेण्यास नकार देतात. पहिल्या तासात तो फक्त 20 लोकांना तिलक लावतो आणि फक्त 50-60 रुपये कमावतो.

या तरुणाच्या म्हणण्यानुसार, तो गंगा आरतीच्या वेळी घाटावर जातो आणि त्यानंतर संपूर्ण दृश्य बदलते. भाविक एकामागून एक त्याच्याकडे तिलक लावण्यासाठी येतात. काही जण 10 रुपये, काही 20, तर काही 100 रुपये देतात. तीन तासांत तो अंदाजे 400 भाविकांना तिलक लावतो आणि या काळात 2,350 रुपये कमावतो. व्हिडिओच्या शेवटी, तिलक लावून किती पैसे कमावता येतात हे हा तरुण सांगतो. या तरुणाच्या मते, तिलक लावून महिन्याला अंदाजे 70,000 रुपये कमावता येतात. हा व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोएंकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “पैसे कमावण्याचा नवीन मार्ग.”

Follow Us