घरात 11 लोक, एकानंही दिलं नाही ‘Vote’! पराभवानंतर ढसाढसा रडला संतोष

| Updated on: Dec 23, 2021 | 11:56 AM

घरातल्या 11 लोकांनी मत दिलं नाही, इथपर्यंत समजून घेता येऊ शकेल मंडळी! पण संतोषला तर चक्क त्याच्या स्वतःच्या बायकोनंही मत दिलं नसल्यानं तो जरा जास्त दुखावला गेला. त्यानंतर निकाल ऐकून बाहेर येताच त्यानं आपलं रडगाणं सगळ्यांना ऐकवलं.

घरात 11 लोक, एकानंही दिलं नाही Vote! पराभवानंतर ढसाढसा रडला संतोष
संतोष प्रधान
Follow us on

निवडणुकीला (Election) तुम्ही उभे राहिलात आणि तुमच्या घरातल्यांनी, नातलगांनी तुम्हाला मत दिलं नाही, तर तुम्हाला कसं वाटेल? दुःख तर होईलच ना? संतोषचं पण तेच झालं. संरपंचपदासाठी निवडणुकीला संतोष (Santosh) उभा राहिला होता. घरात 11 लोक संतोषच्या कुटुंबात होती. घरातली 11 आणि गावातली इतरं काही अशी मिळून आपल्याला मतं मिळतील असं त्याला वाटत होतं. पण घरातील 11 माणसांनीही संतोषच्या पारड्यात मतं न टाकल्यानं संतोषला भावना आवरल्या नाहीत. अवघं एक मत, जे की त्याचं स्वतःचच असेल, ते सोडून बिचाऱ्या संतोषला एकानंही मत दिलं नव्हतं. संतोष बिथरला. ढसाढसा रडू लागला. डोळ्यांतून अश्रूधारा ज्या सुरु झाला, त्या मग थांबायचं नाव घेत नव्हत्या!

कुठं घडली घडना?

गेल्याच काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये (Gujrat) ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळाली होती. निवडणुकीच्या रणधुमाळीत गुजरातच्या वापी (Vapi) जिल्ह्यात असलेल्या छरवाला गावात राहणारा संतोषही संरपंच बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता. निवडणुकीला उभा राहिला. छरवालाच्या या छोऱ्याचं पूर्ण नाव आहे, संतोष हलपती प्रधान.

मतांची गोळाबेरीज

निवडणूक आली की मतांचं गणित हे आलंच! संतोषनंही मतांची गोळाबेरीज केली. आपल्या घरातील 11 आणि गावातील इतरही काही सोयरे-धायरे आपल्याला मतं देतील, असा समज संतोषनं करुन घेतला होता. पण तो गैरसमज असल्याचं निकालानंतर स्पष्ट झालं. संतोषला घरातल्या एकानंही संतोषला मत दिलं नाही. अवघं एकच मत पडलेल्या संतोषला निकालानंतर काय करावं, तेच सुचलं नाही. शाळेत नापास झाल्यानंतर रडणाऱ्या विद्यार्थ्याप्रमाणे संतोष ढसाढसा रडू लागला. घरातल्या लोकांनीही आपल्यावर विश्वास न दाखवल्यानं आपण दुःखी झालो आहोत, घरातल्यांनीही मला आपलं मानलं नाही, तर इतर लोकं कसे आपलं मानतील, असं म्हणत त्यांनं आपलं दुःख बोलून दाखवलं.

बायकोनंही मत दिलं नाही

घरातल्या 11 लोकांनी मत दिलं नाही, इथपर्यंत समजून घेता येऊ शकेल मंडळी! पण संतोषला तर चक्क त्याच्या स्वतःच्या बायकोनंही (Wife) मत दिलं नसल्यानं तो जरा जास्त दुखावला गेला. त्यानंतर निकाल ऐकून बाहेर येताच त्यानं आपलं रडगाणं सगळ्यांना ऐकवलं. लोकांनी कसंबसं त्याला समजावलं, शांत केलं आणि घरी पाठवलं. पण बायकोनंही आपल्याला मत दिलं नाही, हे समजल्यावर कोणताही पती हैराण होईल. तसाच संतोषही हैराण झाला होता!

नुकत्याच गुजरातमध्ये पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. एकूण 8686 पंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये तब्बल 27 हजार उमेदवार रिंगणात उतरले होते. तर 1.19 लोकांनी पंचायत सदस्य बनवण्यासाठी निवडणूक लढवली होती.

पाहा व्हिडीओ –

इतर बातम्या –

Gadchiroli | हत्तींची विदर्भात दस्तक! शेतकऱ्यांचे नुकसान; हत्तींनी स्वीकारला अधिवास

VIDEO: आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याव… म्याव’च्या घोषणा

माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांचा पलटवार