माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांचा पलटवार
chandrakant patil

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला होता. आव्हाडांच्या या विधानावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Dec 23, 2021 | 11:14 AM

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला होता. आव्हाडांच्या या विधानावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. बाप काढणं ही आव्हाडांची संस्कृती आहे. माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

विधान भवन परिसरात मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आव्हाड माझा बाप काढतात ती आव्हाडांची संस्कृती आहे. माझी नाही. माझा बाप काढून उद्धवजींच्या जवळ जावून काय मिळणार आहे? त्यांना जे मिळायचं ते मिळू देत, असं सांगतानाच माझ्या बापाने निवडणूक लढवली नव्हती. ते मिलमध्ये काम करत होते. त्यांचा अपघात झाल्यानंतर 11 महिन्यानंतर ते मिलमध्ये रुजू झाले होते, असं ते म्हणाले.

उद्धवजींनी हट्ट धरू नये

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. उद्धवजींच्या तब्येतीबाबत त्यांनी मला समजून सांगण्याची गरज नाही. मला खूप कल्चर आहे. संघाने आणि माझ्या आईबापाने मला संस्कार दिले आहेत. उद्धवजींची तब्येत बरी होण्यासाठी मला प्रदर्शन करण्याची गरज नाही. मी रोज प्रार्थना करत असतो या माणसाच्या आयुष्यात काय आहे. त्यांना आराम मिळावा ही सर्व देवतांना प्रार्थना करत असतो. ते मुख्यमंत्री आहेत. आजारी असताना त्यांनी विधानसभेत येण्याचा हट्ट धरू नये. त्यांनी दुसऱ्यांना जबाबदारी द्यावी, असंही ते म्हणाले.

जबाबदारी घेतलीय तर निभवा

विधानसभेत अनेक प्रसंग घडतात. त्यावेळी त्या प्रश्नांशी मुख्यमंत्र्यांनाच डील करावी लागते. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस सतत सावध असायचे. विदेशात गेल्यावरही ते चार जणांना कामे नेमून द्यायचे. एल्फिस्टनचा ब्रिज पडला तेव्हा ते विदेशात होते. मुंबईत आल्यावर ते डायरेक्ट घटनास्थळी गेले होते. तुम्ही आमदार व्हा, मंत्री व्हा यासाठी कोणी निमंत्रण देत नाही, तुम्ही स्वत: जबाबदारी घेतली असेल तर तुम्ही ती निभावली पाहिजे, असंही ते म्हणाले.

महापौरांचं स्टेटमेंट बालिश

यावेळी त्यांनी महापौरांच्या टीकेला उत्तर देण्यास नकार दिला. मला महापौरांचा परिचय नाही. त्यांच्यावर बोलण्याची इच्छा नाही. त्यांचं स्टेटमेंट बालिश आहे. उद्धवजींनी आजारी असताना विधानसभेत येण्याचा हट्ट धरू नये असं माझं म्हणणं आहे. त्यांनी इतरांना जबाबदारी सोपवावी. देवेंद्रजी आजारी आहेत का? झोपलेले आहेत का? अरे चाललंय काय? असा सवालच त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

VIDEO: मुख्यमंत्री दोन दिवसात सभागृहात येतीलही, पंतप्रधान तंदुरुस्त, संसदेत का येत नाहीत?; संजय राऊतांचा सवाल

Saamana| भाजपने अयोध्येस चोरांची आळंदी केली, ‘सामना’तून धुलाई; ईडी, सीबीआयला तिथेच कायमस्वरूपी कार्यालय उघडायचा सल्ला

Pathan | ‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खान कामावर परतला, मुंबईत सुरु झाले ‘पठाण’चे चित्रीकरण!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें