Pathan | ‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खान कामावर परतला, मुंबईत सुरु झाले ‘पठाण’चे चित्रीकरण!

Pathan | ‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खान कामावर परतला, मुंबईत सुरु झाले ‘पठाण’चे चित्रीकरण!
Shah Rukh Khan

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तो शेवट ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता, जो 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) झळकल्या होत्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 23, 2021 | 10:32 AM

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तो शेवट ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता, जो 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) झळकल्या होत्या. आता शाहरुखच्या ‘पठाण’ (Pathan) या चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. शाहरुखने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी मुंबईत दिसला. यावेळी लांब केसांमध्ये त्याचा नवा लूक दिसला. शाहरुखचे लांब केसांमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुखने 22 डिसेंबरपासून शूटिंगला सुरुवात केली आहे.

शाहरुखचे फोटो झाले व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@srkking555)

शाहरुख खानने ‘पठाण’ची तयारी सुरू केली आहे. मात्र, अद्याप अभिनेत्याच्या टीमने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या चित्रपटाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. फोटोमध्ये शाहरुखचे लांब केस आणि उत्तम शरीरयष्टीत दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून केसांची पोनीटेल बांधलेली आहे.

‘पठाण’बद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी शाहरुख खान यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये ‘पठाण’साठी शूटिंग करत होता. यासोबतच शाहरुखने काही भाग दुबईत शूट केला आहे. एवढेच नाही, तर तो बुर्ज खलिफावर अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. ‘पठाण’ या चित्रपटात सलमान खानचाही कॅमिओ असणार आहे.

सोशल मीडियापासून दूर गेलाय किंग खान!

शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला NCB ने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. तो 28 दिवस तुरुंगात होता. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख खानने सोशल मीडियापासून अंतर बाळगले आहे. आर्यन जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे, पण तरीही शाहरुखने मीडिया आणि सोशल मीडिया या दोन्हीपासून अंतर ठेवले आहे. घराबाहेरही तो क्वचितच दिसतो.

मात्र, गौरी खानने आता सोशल मीडियावर कमबॅक केले आहे. नुकतीच तिने दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या कामाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच तिने सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या नवीन प्रोजेक्टची झलकही दाखवली आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Ravi Dubey | मालिकेच्या सेटवर भेट झाली अन् अभिनेत्रीच्या प्रेमातच पडला! वाचा रवी दुबेची लव्हस्टोरी…

Ganapath | अरे देवा! टायगरच्या डोळ्याला काय झालं? ‘गणपत’च्या चित्रिकरणादरम्यान टायगर श्रॉफ जखमी!

चाहत्याच्या लग्नात चक्क सेलिब्रिटींची एण्ट्री, ‘ओम आणि स्वीटू’ जोडीने विवाह सोहळ्याचा आनंद दुणावला!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें