Punjabi Pilot Viral Video: पाजीने कमाल कर दित्ता! लोकं म्हणाले, “अस्सा पायलट हवा गं बाई”

काही युजर्सनी तर या पायलटच्या फ्लाईटमध्ये प्रवास करायला आवडेल असंही म्हटलं आहे. इंडिगोचे विमान बेंगळुरूहून चंदीगडला जात होते.

Punjabi Pilot Viral Video: पाजीने कमाल कर दित्ता! लोकं म्हणाले, अस्सा पायलट हवा गं बाई
Punjabi Pilot Video Goes Viral
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 25, 2022 | 1:36 PM

सगळी मजा एकीकडे आणि जिथे सर्रास इंग्रजी वापरली जाते तिथे आपल्याच भाषेत सूचना ऐकणे ही मजा एकीकडे. पंजाबी ऐकण्याच्या बाबतीत तर लोकं फार उत्साही असतात. पंजाबी लोकांचं रक्त आधीच गरम, त्यात त्यांना त्यांची भाषा ऐकली की काय करू आणि काय नाही असं होतं. ही लोकं तर कॅनडा मध्ये जाऊन सुद्धा स्वतःची भाषा बोलतात, इंग्रजीला फार जुमानत नाहीत. असंच ते भाषेवरचं प्रेम! एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात इंडिगोच्या विमानाचा कॅप्टन (Indigo Captain) पंजाबीमध्ये प्रवाशांचं स्वागत करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. अनेक युझर्स आपापल्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवर ही क्लिप शेअर करत आहेत आणि पायलटचं (Punjabi Pilot) कौतुक वाचत आहेत. काही युजर्सनी तर या पायलटच्या फ्लाईटमध्ये प्रवास करायला आवडेल असंही म्हटलं आहे. इंडिगोचे विमान बेंगळुरूहून चंदीगडला जात होते.

व्हायरल पायलट…

विमानातून प्रवास करताना तुमच्या लक्षात आलं असेलच की, विमानातील घोषणा सहसा इंग्रजी आणि हिंदी भाषेत केल्या जातात. पण या विमानाच्या कॅप्टनने पंजाबी आणि इंग्रजी भाषेत मजेशीर पद्धतीने टिप्स देण्यास सुरुवात केल्याने इंडिगोच्या विमानातील प्रवाशांना धक्काच बसला. व्हायरल क्लिपमध्ये पायलट आधी इंग्रजीत बोलतोय. “डाव्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना आपलं फोटोग्राफीचं कौशल्य दाखवता येईल, तर उजवीकडचे लोक हैदराबादकडे पाहतील,” पायलट सांगतात. यानंतर तो पंजाबीत सांगू लागतो, ‘डावीकडच्या प्रवाशांना जयपूर दिसेल, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला भोपाळ पाहता येईल.’ ऐका तुम्हीच काय म्हणतायत हे व्हायरल पायलट…

व्हिडिओ लोकांना खूप आवडला

हा व्हिडिओ @danvir_chauhan नावाच्या हँडलने ट्विटरवर शेअर केला आहे. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कॅप्टनने बंगळुरुहून चंदीगडला जाणाऱ्या प्रवाशांना पंजाबी आणि इंग्रजीमध्ये टिप्स दिल्या. 1 मिनिट 6 सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला असून ते तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत.