AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : या पाच चुका पडू शकतात खूप महागात, पती-पत्नीमध्ये सतत होत राहतील भांडणं

फेंग शुई हे चीनी वास्तुशास्त्र आहे, फेंग शुईनुसार अशा काही चुका आपल्या हातून होतात, ज्याचा परिणाम हा थेट आपल्या वैवाहिक जीवनावर होतो, पती-पत्नीमध्ये काहीही कारण नसताना सतत भांडणं होत राहतात, अशाच काही चुकांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Feng Shui : या पाच चुका पडू शकतात खूप महागात, पती-पत्नीमध्ये सतत होत राहतील भांडणं
Feng Shui Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 21, 2026 | 9:25 PM
Share

फेंग शुई हे देखील वास्तुशास्त्राप्रमाणेच नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा या दोन प्रमुख घटकांवर काम करतं. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा घरातील वातावरण हे नेहमी आनंदी असतं, घरात सुख समृद्धी असते. आर्थिक स्थैर्य असतं. मात्र या उलट जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा मात्र घरावर अचानक संकट येण्यास सुरुवात होते, आर्थिक संकट येतात, आरोग्याच्या बाबतीत संकट येतात, तसेच अनेकदा काही कारण नसताना देखील पती -पत्नीमध्ये भांडणं होतात. पती-पत्नी संसाराचे दोन मुख्य स्तंभ असतात, या दोन स्तंभांवरच संसाराचा संपूर्ण डोलारा उभा असतो, यातील एक स्तंभ जरी हालला तरी हा संसाराचा संपूर्ण डोलारा कोसळून शकतो. त्यामुळे पती-पत्नीने एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. मात्र अशा काही चुका असतात ज्या झाल्यास त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात फेंग शुईमध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

बेडरूम नेहमी स्वच्छ ठेवा – बेडरूममध्ये कधीही अनावश्यक पसारा होऊ देऊ नका, जर बेडरूम अस्तव्यस्त असेल तर त्याचा परिणाम हा पती-पत्नीच्या नात्यावर देखील होतो, घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे पत्नी-पत्नीमध्ये सारखे भांडणं होतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे.

बेडची दिशा – बेडची दिशा ही नेहमी योग्य असावी, बेड हा शक्यतो पूर्व -पश्चिम असावा, तो दक्षिण -उत्तर असा नसावा, तसेच कधीही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये, असंही फेंगशुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

निगेटिव्ह फोटो- जर तुमच्या बेडरूममध्ये एखादा निगेटिव्ह फोटो असेल तर तो बेडरूममधून काढून टाका, त्यामुळे घरात निगेटिव्ह ऊर्जा तयार होऊ शकते.

काळे पडदे – बेडरूमच्या खिडक्यांना कधीही काळे पडदे असू नये, असं फेंग शुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. काळ्या रंगामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होतो, असं मानलं जातं.

पाणी – बेडरूममध्ये अशी कोणतीही गोष्ट ठेवू नका, ज्याचा संबंध थेट पाण्याशी असेल, जसं की फाउंटन, किंवा इतर वस्तू असं फेंगशुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...