AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Pitch Report: सुपर 8 फेरीतील भारत अफ्रिका सामन्यात कशी आहे खेळपट्टी? जाणून घ्या

India vs  South Africa T20 World cup 2026 Pitch Report: सुपर 8 फेरीतील भारत दक्षिण अफ्रिका सामना अहमदबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना भारताने येथेच खेळला होता. त्यामुळे भारताला या खेळपट्टीचा चांगला अंदाज आहे. 

IND vs SA Pitch Report: सुपर 8 फेरीतील भारत अफ्रिका सामन्यात कशी आहे खेळपट्टी? जाणून घ्या
IND vs SA Pitch Report: सुपर 8 फेरीतील भारत अफ्रिका सामन्यात कशी आहे खेळपट्टी? जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 21, 2026 | 9:17 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील भारत दक्षिण अफ्रिका सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. हा सामना 22 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना दोन्ही संघांना उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक विजय हा उपांत्य फेरीच्या मार्गावर ठेवणारा आहे. त्यामुळे विजयी चव चाखण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. भारतीय संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना याच मैदानावर खेळला आहे. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारताने या खेळपट्टीचा चांगला अंदाज घेतला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकूनही प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच दव फॅक्टरमध्ये गोलंदाजीचा अंदाज घेतला. त्यामुळे भारताला या खेळपट्टीबाबत बऱ्यापैकी माहिती आहे. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजीचा कस लागला होता. पण आता दक्षिण अफ्रिकन संघ आहे आणि चुका करून चालणार नाही. कारण भारताप्रमाणे दक्षिण अफ्रिकन संघही साखळी फेरीतील चारही सामने जिंकून येथे पोहोचला आहे.

अहमदाबादची खेळपट्टी कशी आहे?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. या खेळपट्टीवर जोरदार फटकेबाजी होईल. मैदान मोठं असल्याने गॅप शोधून चौकार षटकारांची आतषबाजी करणं फलंदाजांना सोपं जाईल. त्यामुळे गोलंदाजांना या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना सावध राहावं लागेल. टप्पा टाकताना चूक केली की चेंडू थेट प्रेक्षकांकडे पोहोचलेला असेल. त्यामुळे या खेळपट्टीवर आव्हान गाठणं सोपं जाईल असंच दिसत आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. पहिल्या डावात कमी धावांवर रोखून दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणं सोपं जाईल. दव फॅक्टरमुळे गोलंदाजांना दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं सोपं नसेल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल तितकाच महत्त्वाचा असणार आहे.

हवामान कसं असेल?

अहमदाबादमध्ये आकाश निरभ्र असेल त्यामुळे पावसाची शक्यता नाही. त्यामुळे हा सामना विनाखंड सुरू होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता नाणेफेकीचा कौल होईल आणि 7 वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. मैदान आणि आसपास तापमान 24 ते 29 डिग्री सेल्सियस असेल. तर आर्द्रता 40 टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. एकंदरीत हे वातावरण खेळण्यासाठी उत्तम आहे.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा