Car Accident Video: “जाको राखै साइयाँ, मार सकै ना कोय”, थोडक्यात वाचला, देवानेच वाचवलं म्हणायचं…

| Updated on: Jul 30, 2022 | 1:18 PM

Car Accident Video: हा व्हिडीओ इतका भयानक आहे की थरकाप उडतो, कधीही काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय हा व्हिडीओ बघून येतो. एका सेकंदाचाही विलंब झाला असता तर त्या व्यक्तीचा जीव गेला असता.

Car Accident Video: जाको राखै साइयाँ, मार सकै ना कोय, थोडक्यात वाचला, देवानेच वाचवलं म्हणायचं...
Car Accident Viral Video
Image Credit source: Social Media
Follow us on

Car Accident Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल (Social Media Viral Media) होत आहे, जो व्हिडीओ बघून तुमच्या तोंडून लगेच बाहेर येईल ‘जाको रखे सैया मार साके ना कोय’. याचा अर्थ असा की, देव ज्याचे रक्षण करतो त्याला कोणीही मारू शकत नाही. असाच काहीसा प्रकार या व्हायरल (Viral) व्हिडीओमध्ये दिसत आहे. एक माणूस आपल्या गाडीवर पडलेला बर्फ साफ करत होता आणि अचानक एक भयंकर गोष्ट गाडीवर येऊन पडते आणि गाडीचं छत आणि काच तुटते. त्या माणसाचा जीव नशिबाने वाचतो, ही दिलासा देणारी बाब आहे. हा व्हिडीओ इतका भयानक (Dangerous Video) आहे की थरकाप उडतो, कधीही काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय हा व्हिडीओ बघून येतो. एका सेकंदाचाही विलंब झाला असता तर त्या व्यक्तीचा जीव गेला असता.

अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

अपघाताचा हा भितीदायक व्हिडिओ एनएफटीबॅडर नावाच्या ट्विटर युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून 3 हजारहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे.

या व्यक्तीचे प्राण थोडक्यात वाचले

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती आपल्या गाडीजवळ उभा राहून त्यावर पडलेला बर्फ साफ करत होता. हिमवृष्टीमुळे त्याची संपूर्ण गाडी बर्फाने आच्छादली आहे. मग त्याची नजर वर जाते आणि तो पाहतो की आधी काही बर्फाचे तुकडे गाडीवर पडतात आणि मग गाडीच्या छतावर एक भयंकर गोष्ट पडते. गाडीवर ही वस्तू पडताच तिचे छत पूर्णपणे तुटले. गाडी पूर्ण कामातून जाते. जेव्हा ही अवजड वस्तू गाडीवर पडली तेव्हा या व्यक्तीचे प्राण थोडक्यात वाचलेत. सुदैवाने या घटनेत तो बळी ठरलेला नाही. तो वेळीच त्या गाडी जवळून बाजूला झाला.

अशा प्रतिक्रिया युझर्सनी दिल्या

या व्हायरल व्हिडिओवर युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत, एका यूजरने लिहिले की, कारचे इंजिन सुरक्षित आहे. तो तुकडा काढा आणि ड्रायव्हिंग करा. त्याचवेळी आणखी एका युझरने लिहिले की, चमत्कारिकरित्या वाचवले प्राण, कल्पना करा की जर तो माणूस ड्रायव्हिंग सीटवर बसला असता तर काय झाले असते?