Video: एकमेकींशी खेळणाऱ्या मांजरींचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, इतक्या गोंडस मांजरी आम्ही नाही पाहिल्या!

. या दोघी मांजरी एकमेकींशी भांडत आहेत, पण त्यांचं भांडणं एकदम सौम्य आहे, मात्र पाहणाऱ्याला असं वाटतं की, या एकमेकींशी खेळत आहेत.

Video: एकमेकींशी खेळणाऱ्या मांजरींचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, इतक्या गोंडस मांजरी आम्ही नाही पाहिल्या!
मांजरी खेळतानाचा व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 6:09 PM

सोशल मीडियावर प्राण्यांचे लाखो फोटो आणि व्हिडीओ आहेत. प्राण्यांचे काही व्हिडिओ मजेदार आणि गोंडस असतात, तर काही व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या बालपणांची आठवण येईल. (cat playing game and fighting video goes viral on social media)

आपल्या सर्वांना माहीत आहे की मांजरी खूप गोड असतात, त्यांचीच ही गोष्ट लोकांना आकर्षित करते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन मांजरी एकमेकींशी खेळताना दिसत आहेत. या एकमेकींच्या हाताला हात मारत राहतात, आजूबाजूचं त्यांना काही देणं-घेणं नाही.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, 2 मांजरी त्यांचे पंजे एकमेकींच्या पंजावर मारत आहेत. या दोघी मांजरी एकमेकींशी भांडत आहेत, पण त्यांचं भांडणं एकदम सौम्य आहे, मात्र पाहणाऱ्याला असं वाटतं की, या एकमेकींशी खेळत आहेत. एकमेकींच्या पंजावर या पंजे मारत आहे. अगदी तालबद्धरित्या हे सगळ सुरु आहे. आजूबाजूला लोक त्यांचे व्हिडीओ काढत आहेत, त्यांच्याकडे बघत आहेत, याचं त्यांना काहीही देणं-घेणं नाही.

व्हिडीओ पाहा:

सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. हेच कारण आहे की, अनेक युजर्सने व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. एका नेटकऱ्याने सांगितलं की. हा प्रसंग खूप भारी आहे, मी या मांजरींच्या प्रेमातच पडलो. त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले की, मी या प्रकारची लढाई याआधी कधीही पाहिली नाही. याशिवाय इतर अनेकजन इमोजीजद्वारे आपलं मत नोंदवत आहेत.

हेही पाहा:

Video: कुत्र्यापासून वाचण्यासाठी भाऊ थेट कारच्या टपावर, नेटकरी म्हणाले, “याच्यावर चिडताही येणार नाही!”

Know This: अशी आई, जी बाळाला दूध पाजते आणि मरते, बाळांचं पोट भरण्यासाठी मृत्यूला कवटाळणारी आई