VIDEO | आयुष्याची गरज काय? उद्योगपती हर्ष गोयंकांनी स्टोरीटेलिंग व्हिडीओ शेअर, एक तल्लीन करणारी गोष्ट!

| Updated on: Mar 11, 2021 | 11:43 AM

सोशल मीडियावर सक्रिय असेलेल प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी गृपचे मालक हर्ष गोयंका (Harsh Goenkas Tweet About Friendship) हे पुन्हा एकदा त्यांच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहेत.

VIDEO | आयुष्याची गरज काय? उद्योगपती हर्ष गोयंकांनी स्टोरीटेलिंग व्हिडीओ शेअर, एक तल्लीन करणारी गोष्ट!
Harsh Goenka
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असेलेल प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी गृपचे मालक हर्ष गोयंका (Harsh Goenkas Tweet About Friendship) हे पुन्हा एकदा त्यांच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहेत. हर्ष गोयंका यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे, यात ते एक कहाणी सांगत आहेत. या कहाणीत मैत्री एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती महत्त्वाची असते यावर ते सांगत आहे. या व्हिडीओमध्ये हर्ष गोयंका हे त्यांच्या काही मित्रांसोबत समुद्र किनारी निवांत बसलेले आहेत. याच मित्रांना ते एक कहाणी सांगत आहेत. ही कहाणी काय आहे जाणून घेऊ (Chairman Of RPG Group Harsh Goenkas Tweet About Friendship)-

हर्ष गोयंकांची तल्लीन करणारी कहाणी –

या बीचवरील एक व्हिडीओ हर्ष गोयंकांनी शेअर केला आहे. याला त्यांनी द आर्ट ऑफ स्टोरीटेलिंग असं कॅप्शनही दिलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अडीच हजार लोकांनी लाईक केलं आहे तर 511 जणांनी रिट्विटही केलं आहे.

हर्ष गोयंका यांचं ‘ते’ ट्वीट

आयुष्याची गरज काय?

ही राजस्थानातील कहाणी आहे. एका बड्या व्यापाऱ्याचा मृत्यू होतो. त्यांच्याकडे 19 उंट असतात. जेव्हा मृत्यूपत्र उघडण्यात आलं तेव्हा त्यात लिहिलं होतं की अर्थे उंट माझ्या मुलाला द्या, एक चतुर्थांश उंट माझ्या मुलीला द्या आणि ज्याने माझी सेवा केली ज्याला एकाचा पाचवा भाग इतके उंट द्या. आता सर्व विचारात पडले. इतका विद्वान माणूस आहे हा पागल निघाला. आता 19 उंटाचे अर्धे कसे करणार. एका उंटाला मारावं लागेल, साडे नऊ साडे नऊ होऊ शकत नाही. एकाचा पाचवा भाग केला तरी साडे चार साडे चार येणार. आता काय करावं…

मग त्यांना आठवलं की त्यांच्या वडिलांचा एक खास आणि हुशार मित्र आहे, त्याला बोलावण्यात आलं. ते मित्र उंटावर आले आणि म्हणाले की काही हरकत नाही तुम्ही एकमेकांशी भांडू नका, माझाही उंट तुम्ही ठेवून घ्या. म्हणजे 19 उंटाचे झाले 20 उंट. मग त्यांनी 20 चे अर्धे दिले 10 उंट. मुलाला फ्री केलं. एक चतुर्थांश म्हणजेच 5 उंट दिले मुलीला. 20 चा पाचवा भाग म्हणजे 4 उंट दिले सेवकाला आणि उरलेला आपला एक उंट घेऊन तो मित्र परत गेला.

आयुष्य जगण्यासाठी इतर गोष्टी ज्या आहेत त्या 19 आहेत, पण या सर्वांना शांत राहण्यासाठी सोबत मित्र हवाच. आयुष्य खुशाल जगायचं असेल तर आयुष्यात चांगले मित्र असणे आवश्यक आहे. मित्र बनवा आणि आयुष्य जगा….

Chairman Of RPG Group Harsh Goenkas Tweet About Friendship

संबंधित बातम्या :

ऑर्डर कॅन्सल केली म्हणून डिलीव्हरी बॉय भडकला, रागाच्या भरात महिलेचं फोडलं नाक

VIDEO : गाडी नो पार्किंगला लाऊन पोलिसांशी हुज्जत, महिला SI ने कानशिलात लगावली

डफलीच्या साथीला एकतारीची धून, व्हायरल व्हिडीओने पंतप्रधानांचं लक्ष वेधलं, मोदी म्हणतात…