AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगभरात हाहा:कार, तरुणांसाठी वाईट बातमी; अचानक चॅटजीपीटी बंद; कंपनी म्हणाली…

जगभरात सध्या ChatGPT ची सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे.भारतासह अनेक देशांमध्ये ChatGPT वापरकर्त्यांना मोठ्या अडचणी येत असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

जगभरात हाहा:कार, तरुणांसाठी वाईट बातमी; अचानक चॅटजीपीटी बंद; कंपनी म्हणाली...
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 25, 2026 | 4:01 PM
Share

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित लोकप्रिय ChatGPT ची सेवा शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक ठप्प झाल्याने भारतासह जगभरातील लाखो वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी अॅप आणि वेबसाइट दोन्हीवर ChatGPT वापरताना समस्या येत असल्याची तक्रार केली.

इंटरनेट सेवा आणि विविध वेबसाइट्समधील बिघाडाची नोंद करणाऱ्या DownDetector या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या. या संकेतस्थळानुसार, ChatGPT च्या सेवेमध्ये अचानक व्यत्यय आला असून अनेक वापरकर्त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याची किंवा सेवा पूर्णपणे बंद झाल्याची समस्या जाणवत होती.

भारतासह अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांमधील वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर तसेच DownDetector वर सेवा बंद असल्याची माहिती दिली. काहींना ChatGPT मध्ये लॉगिन करता येत नव्हते तर काहींना प्रश्न विचारल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.

सेवेत अडचण असल्याची कबुली

दरम्यान, OpenAI नेही ChatGPT सेवेमध्ये अडचणी येत असल्याची कबुली दिली आहे. कंपनीने अधिकृतपणे सांगितले की, या बिघाडामागील नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक पथक तपास करत असून सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या बिघाडाचा परिणाम वैयक्तिक वापरकर्त्यांसह अनेक विद्यार्थी, व्यावसायिक, संशोधक आणि AI-आधारित सेवांवर अवलंबून असलेल्या अनेक संस्थांवर झाला आहे. अनेकांना दैनंदिन कामकाजात अडथळे आले तर काही व्यवसायांनाही याचा फटका बसला आहे. सध्या OpenAI कडून सेवा पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, समस्या दूर झाल्यानंतरच बिघाडाचे नेमके कारण काय होते हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ChatGPT काय आहे?

ChatGPT हा ओपनएआयने विकसित केलेला एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट आहे. तो वापरकर्त्याच्या प्रत्येक सूचनांना प्रतिसाद देतो. तो पत्रे लिहू शकतो, भाषांतर करू शकतो आणि कथासुद्धा तयार करू शकतो. त्यामुळे याचा वापर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आता, त्याचा वापर प्रतिमा आणि इतर मजकूर तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. बरेच लोक ईमेल आणि सोशल मीडिया पोस्ट तयार करण्यासाठी त्याचा वापर करत आहेत.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार