Video | अमानुषतेचा कळस ! खांबाला बांधून कर्मचाऱ्याला मारहाण, विदारक व्हिडीओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रवांडा येथील असून यामध्ये एका चिनी मॅनेजरने आपल्या एका कर्मचाऱ्यावर चोरीचा आरोप केला आहे. या मॅनेजरने कर्मचाऱ्याचे हातपाय बांधले आहेत. तसेच मॅनेजने कर्मचाऱ्याला एका खांबाला बांधले असून त्याला त्रास दिला जात आहे.

Video | अमानुषतेचा कळस ! खांबाला बांधून कर्मचाऱ्याला मारहाण, विदारक व्हिडीओ व्हायरल
MANAGER BEATING WORKER
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 11:17 PM

मुंबई : सोशल मीडियावर एका चिनी मॅनेजरच्या अमानुषतेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मॅनेजर त्याच्या नोकराला एका चोरीच्या आरोपाखाली अमानुषपणे मारत आहे. ही मारहाण पाहून अनेकांनी राग व्यक्त केला आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चिनी मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. (chinese manager beating his worker brutally video went viral on social media)

चिनी मॅनेजर कर्मचाऱ्याला दोरीने मारतोय

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रवांडा येथील असून यामध्ये एका चिनी मॅनेजरने आपल्या कर्मचाऱ्यावर चोरीचा आरोप केला आहे. या मॅनेजरने कर्मचाऱ्याचे हातपाय बांधले आहेत. तसेच कर्मचाऱ्याला एका खांबाला बांधले असून त्याला त्रास दिला जात आहे. मॅनेजर कर्मचाऱ्याला एका दोरीने मारत आहे. कर्मचाऱ्याच्या तोंडावर तसेच संपूर्ण अंगावर मॅनेजर मारत असताना आपल्याला दिसत आहे. हा कर्मचारी रडत असून त्याची शुद्ध हरपली आहे. तर बाकीचे लोक या कर्मचाऱ्याकडे फक्त पाहत आहेत.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियावर लोकांचा संताप

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी रवांडा तसेच चिनी दूतावासांना टॅग करुन चिनी मॅनेजरला शिक्षा करावी अशी मागणी करत आहेत. सध्या मॅनेजरला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र या व्हिडीओच्या निमित्ताने काही लोकांनी कृष्णवर्णीयांवरील अत्याच्याराचे फोटोदेखील सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

इतर बातम्या :

Video | बलशाली मुलगा आर्म रेसलिंगमध्ये चारी मुंड्या चीत, 10 वर्षीय मुलीने करुन दाखवलं, व्हिडीओ व्हायरल

Video | उद्घाटन करताना कात्री खराब झाली, शेवटी दाताने फीत कापण्याची वेळ, पाकिस्तानी मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल

Video | कुत्रा निघाला बाजाराला, बास्केट घेऊन केली फळांची खरेदी, खास व्हिडीओ पाहाच

(chinese manager beating his worker brutally video went viral on social media)