Video | बलशाली मुलगा आर्म रेसलिंगमध्ये चारी मुंड्या चीत, 10 वर्षीय मुलीने करुन दाखवलं, व्हिडीओ व्हायरल

. महिला तसेच मुली सामर्थ्यशाली असतात हे दाखवून देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 10 वर्षीय मुलीने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलाचा आर्म रेसलिंगमध्ये पराभव केला आहे.

Video | बलशाली मुलगा आर्म रेसलिंगमध्ये चारी मुंड्या चीत, 10 वर्षीय मुलीने करुन दाखवलं, व्हिडीओ व्हायरल
GIRL VIRAL VIDEO

मुंबई : आपल्या समाजात महिलांना कायम दुय्यम स्थान दिलं जातं. बैद्धिक, तसेच शारीरिक क्षमता असूनही अनेक ठिकाणी महिलांना तसेच मुलींना डावललं जातं. मात्र, संधी दिली तर महिला त्याचं सोन नक्कीच करतात हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. महिला तसेच मुली सामर्थ्यशाली असतात हे दाखवून देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 10 वर्षीय मुलीने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलाला आर्म रेसलिंगमध्ये पराभूत केलं आहे. (ten year old girl defeated boy bigger than than her in arm wrestling video went viral on social media)

दहा वर्षीय मुलीचे मुलाशी दोन हात

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका दहा वर्षीय छोट्या मुलीने तिच्यापेक्षा मोठ्या मुलावर मात केली आहे. या मुलीची हिम्मत आणि ताकद पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. या व्हिडीओमध्ये आर्म रेसलिंगचा सामना पाहायला मिळतोय. एक छोटी दहा वर्षांची मुलगी आपल्यापेक्षा ताकदवान मुलाशी दोन हात कसे करेल ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. सामन्याला सुरुवात झाल्यावर मुलगी मोठ्या ताकदीनीशी लढत आहे. मुलीने आपल्या समोरच्या मुलाला हरवण्याचा चंग बांधला आहे.

मुलीने मुलाला पराभूत केलं

काहीही झालं तरी मला जिंकायचं आहे हे ठरवल्यामुळे मुलगी मोठ्या हिमतीने मुलाशी लढत आहे. शेवटी मुलीने समोरच्या बलशाली मुलाला धूळ चारली आहे. मुलीने त्याला चारी मुंड्या चीत केलंय. फक्त दहा वर्षाच्या मुलीने मुलाला पराभूत केले आहे. या छोट्या मुलीचा व्हिडीओ सन 2019 मधील आहे. मात्र, हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या जुन्या व्हिडीओला मोठ्या आवडीने पाहत आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Rob Vigeant (@robvigeant)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर केले जात आहे. तसेच व्हिडीओ जुना असला तरी लोक त्याला आवडीने पाहत आहेत. सध्या हा व्हिडीओ तुम्हाला इन्स्टाग्रामवर robvigeant या अकाऊंटवर पाहायला मिळेल.

इतर बातम्या :

Video | कुत्रा निघाला बाजाराला, बास्केट घेऊन केली फळांची खरेदी, खास व्हिडीओ पाहाच

सिद्धार्थच्या निधनानंतर चाहत्यांवर शोककळा, #sidnazz हॅशटॅगखाली शहनाजसोबतचे व्हिडीओ व्हायरल

Video | सिद्धार्थचा जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणतो “आयुष्य खूप मोठं आहे, पुन्हा भेटू”, चाहते भावूक

(ten year old girl defeated boy bigger than than her in arm wrestling video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI